September 10, 2024 1:28 PM

views 36

भारतीय सायबर अपराध प्रतिबंधक समन्वय केंद्राच्या ४ नवीन यंत्रणांचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

सायबर सुरक्षा हा विषय केवळ डिजिटल व्यवहारांपुरता सीमित राहिला नसून देशाच्या संरक्षण यंत्रणेचं अविभाज्य अंग बनला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. आय फोर सी म्हणजेच भारतीय सायबर अपराध प्रतिबंधक समन्वय केंद्राच्या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्यात आज नवी दिल्ली इथं ते बोलत होते. जगातल्या एकूण डिजिटल व्यवहारांपैकी जवळजवळ निम्मे व्यवहार भारतात होतात,त्यामुळे भारतात सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञान आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सायबर गुन्ह्यांविषयीच्य...