August 7, 2025 1:23 PM

views 84

JammuKashmir : CRPF चा ट्रक दरीत कोसळून ३ जवान ठार, १५ जखमी

जम्मू काश्मीरमध्ये उधमपूर इथं आज केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनाला झालेल्या अपघातात ३ जवान ठार झाले असून इतर १५ जण जखमी झाले आहेत. या जवानांना घेऊन जाणारी बस रस्त्यावरून घसरुन खोल दरीत कोसळून हा अपघात झाला. जवानांची १८७ बटालियन बसंत घर इथली कारवाई करुन परतत असताना उधमपूर जिल्ह्यातल्या कांदवा इथं हा अपघात झाला. या वाहनात एकूण २३ जवान होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

July 11, 2025 8:14 PM

views 77

मुदखेडमध्ये  केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १४८ जवानांचा दीक्षांत समारंभ

नांदेड जिल्ह्यात मुदखेड इथं केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १४८ जवानांचा दीक्षांत समारंभ आज झाला. यावेळी उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या जवानांना विशेष पारीतोषिक देऊन गौरवण्यात आलं तसच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केली. अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.

April 13, 2025 2:34 PM

views 88

CRPFच्या ५ कंपन्यांना पश्चिम बंगालच्या हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबादमध्ये जाण्याचे आदेश

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पाच कंपन्यांना पश्चिम बंगालच्या हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबादमध्ये जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रांची, जमशेदपूर आणि राजारहाट इथून या कंपन्या मुर्शिदाबादला जातील. वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात इथं सुरू असलेल्या निदर्शनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तातडीनं केंद्रीय सशस्त्र दलांना पाचारण करायचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयानं काल दिले होते. दरम्यान, अतिरिक्त पोलीस महासंचालक सुप्रतिम सरकार आणि विनीत गोयल यांनी समशेरगंज इथं भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतल...