November 29, 2024 7:39 PM

views 32

पुण्यामधल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४७ तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा संपन्न

पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १४७ व्या तुकडीचा दीक्षान्त समारंभ आज झाला. लखनौ विद्यापीठाचे कुलगुरु आलोक कुमार राय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यंदा ३५९ स्नातकाना पदवी प्रदान करण्यात आली.   यामध्ये विज्ञान शाखेचे ८३, संगणक विज्ञान ८६, कला शाखेचे ५८ तर बी टेक शाखेच्या १३२ छात्रांचा समावेश असून १९ परदेशी छात्र आहेत. उद्या सकाळी १४७ व्या तुकडीचं दीक्षांत संचलन होणार असून, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग मानवंदना स्वीकारतील.

September 30, 2024 8:07 PM

views 39

योजनांमुळे महिलांना आरोग्य सेवेचा लाभ मिळण्यात लक्षणीय वाढ – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

देशात आरोग्य सुविधांचा विस्तार करण्यासाठी केंद्रसरकार सातत्यानं प्रयत्न करत असून, आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीमुळे महिलांना आरोग्य सेवेचा लाभ मिळण्यात लक्षणीय वाढ झाली आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्लीत  अटलबिहार वाजपेयी आयुर्विज्ञान संस्था आणि डॉ राममनोहर लोहिया रुग्णालयाच्या दहाव्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या. भक्कम आरोग्य सेवा सुविधा उभारण्यासाठी केंद्रसरकारनं गेल्या १० वर्षात केलेली कामं त्यांनी अधोरेखित केली. वैद्यकीय मह...