March 12, 2025 1:18 PM

views 46

अवैध कोळसाखाणी बंद करण्याची जबाबदारी राज्यसरकारांची – केंद्र सरकार

अवैध कोळसाखाणी बंद करण्याची जबाबदारी राज्यसरकारांची असल्याचं आज केंद्रसरकारनं लोकसभेत सांगितलं. आसाममधे रॅटहोल कोळसाखाणींमधे झालेल्या अपघातात कामगारांचा मृत्यू झाल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला केंद्रीय कोळसामंत्री जी किशन रेड्डी उत्तर देत होते. या संदर्भात आपण आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्याशी चर्चा केली असून एकूणच कोळसाखाणींमधे अपघातांचं प्रमाण  कमी करण्यासाठी केंद्रसरकार राज्यसरकारांशी संपर्कात आहे, असं ते म्हणाले. कोळसाखाणींमधली सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे, झारखंड मधे बे...

December 2, 2024 2:45 PM

views 38

गेल्या ८ महिन्यांत कोळसा खाणींमधून ११ कोटी २० लाख टन इतकं उत्पादन

देशातल्या कोळसा खाणींमधून गेल्या ८ महिन्यांत ११ कोटी २० लाख टन इतकं उत्पादन झाल्याची माहिती केंद्रीय कोळसा मंत्रालयाने दिली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या उत्पादनाच्या तुलनेत यंदा ३५ टक्क्यांची वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात त्यात आणखी १ कोटी ७० लाख टन कोळशाची भर पडली आहे. देशांतर्गत उर्जा निर्मितीला प्राधान्य देऊन सरकार भारताला पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने पुढे घेऊन जात असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातल्या विकसित भारत २०४७ मधलं ते पुढचं पाऊल आहे, असं मंत्राल...

June 20, 2024 8:14 PM

views 54

कोळसा खाणींच्या व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी बैठक

कोळसा खाणींच्या व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज कोळसा मंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. कोळशाची आयात कमी करण्यासाठी कोळसा उत्पादन वाढवण्याची गरज यावेळी मंत्री रेड्डी यांनी व्यक्त केली. तसंच कोळसा खाणी लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी राज्य सरकार, पर्यावरण मंत्रालयाशी समन्वय साधण्याच्या सूचना रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.