October 13, 2024 7:21 PM

views 32

मुंबईतल्या विविध प्रकल्पांचं आणि विकासकामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण

मराठी भाषा भवन, सावित्रीदेवी फुले छात्रालयासह अनेक नवीन प्रकल्पांचं आणि विविध विकासकामांचं भूमिपूजन तसंच लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत केलं. जवाहर बालभवन, सावित्रीबाई फुले छात्रालय यांचे नुतनीकरण तसंच नायगाव शिवडी पोलीस वसाहतींचे नुतनीकरण अशा अनेक विकासकामांचा यात समावेश आहे. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मराठी भाषा ही अभिजात आहेच पण आता याला राजमान्यता मिळाली...

June 16, 2024 8:47 PM

views 59

विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा – मुख्यमंत्री शिंदे

पूर्ण ताकतीनं विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे, निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत. पक्षाच्या ५८ व्या वर्धापनदिनाच्या तयारीच्या अनुषंगानं आज पक्षाचे सर्व नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक त्यांनी आज मुंबईत घेतली. त्यावेळी ते बोलत होते.