June 21, 2025 8:03 PM

views 88

देशातलं पहिलं योग धोरण उत्तराखंडकडून जाहीर

देशातलं पहिलं योग धोरण उत्तराखंड सरकारनं आज जाहीर केलं. २०३० पर्यंत राज्यात ५ नवीन मोठी योग केंद्र स्थापन करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. तसंच पुढच्यावर्षीच्या मार्चपर्यंत सर्व आयुष आरोग्य केंद्रात योग सुविधा उपलब्ध केल्या जातील. याशिवाय योग आणि ध्यान केंद्र विकसित करण्यासाठी राज्य सरकार २० लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देणार आहे. योग, ध्यान, निसर्गोपचार या क्षेत्रात संशोधनासाठी सरकार १० लाख रुपयांचं अर्थसहाय्य देणार आहे.    हे धोरण उत्तराखंडला योग आणि आरोग्य कल्याण क्षेत्रात जागतिक राजधानी म्...

January 20, 2025 7:44 PM

views 69

उत्तराखंड राज्य मंत्रिमंडळाची समान नागरी संहितेला मान्यता

उत्तराखंड राज्य मंत्रिमंडळाने आज समान नागरी संहितेला मान्यता दिली. तात्काळ प्रभावानं त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी केली. या निर्णयामुळे उर्वरित राज्यांना त्याची प्रेरणा मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.  

December 18, 2024 8:09 PM

views 55

उत्तराखंडमधे येत्या जानेवारीपासून समान नागरी कायद्याची अंमलबजावणी-पुष्कर सिंग धामी

उत्तराखंडमधे येत्या जानेवारीपासून समान नागरी कायद्याची अंमलबजावणी केली जाईल असं उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी सांगितलं. उत्तराखंड गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या डेहराडून इथं झालेल्या बैठकीत धामी यांनी ही माहिती दिली. समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड  हे पहिलं राज्य ठरणार असल्याचं ते म्हणाले. सामाजिक समानता आणि एकता अधिक दृढ करण्याच्या दिशेनं हा एक मैलाचा दगड असल्याचं त्यांनी सांगितलं. या कायद्याची अंमलबजावणी करणारं उत्तराखंड हे पहिलं राज्य आहे असा उल्लेख प्...

December 12, 2024 3:38 PM

views 63

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते जागतिक आयुर्वेद परिषद आणि आरोग्य एक्स्पो २०२४चं उदघाटन

जागतिक आयुर्वेद परिषद आणि आरोग्य एक्स्पो २०२४चं उदघाटन आज उत्तराखंडमधल्या डेहराडून इथं उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते झालं. ही आयुर्वेद परिषद जगभरातील तज्ज्ञ, संशोधक आणि अभ्यासकांना एकत्र आणून प्राचीन उपचार परंपरा आणि आरोग्यसेवा उद्योगातल्या अत्याधुनिक नवकल्पनांमधील समन्वय साधण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची ठरेल, असा विश्वास धामी यांनी व्यक्त केला.