March 7, 2025 1:29 PM

views 78

२०२७ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार – अमित शाह

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०२७ पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, याचा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. केंद्रीय औद्यागिक सुरक्षा दल-CISF च्या ५६ व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते जवानांशी बोलत होते. देशातील महत्त्वाच्या संस्थांच्या सुरक्षेत तैनात असलेलं CISF हा राष्ट्राच्या विकासाचा महत्त्वाचा भाग असल्याचंही शाह म्हणाले. CISF च्या महिला तुकडीचंही शाह यांनी कौतुक केलं.

March 6, 2025 8:34 PM

views 65

आगामी दोन वर्षात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात २० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती होणार

आगामी दोन वर्षात  केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात २० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती होणार असल्याची माहिती महासंचालक राजविदंर सिंग भट्टी यांनी दिली. ते चेन्नईत बोलत होते.     माऊंट एव्हरेस्ट चढाई करण्यासाठी दलाच्या महिलांचं  प्रशिक्षण सुरू आहे. तसंच सुरक्षेसंदर्भातील आधुनिक आव्हानांना तोंड देण्यासाठी योग्य ती पावलं उचलली जात असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

November 12, 2024 8:32 PM

views 43

CISF मध्ये पूर्णपणे महिलांचा समावेश असलेल्या पहिल्या बटालियनच्या स्थापनेला केंद्रीय गृहमंत्रालयाची मंजुरी

CISF अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातल्या पूर्णपणे महिलांचा समावेश असलेल्या पहिल्या बटालियनला केंद्रीय गृहमंत्रालयानं आज मंजुरी दिली. CISF च्या ५३ व्या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे आदेश दिले होते. सध्या यात दलात ७ टक्के महिला आहेत. नव्या बटालियनची भरती, प्रशिक्षण आणि मुख्यालयासाठी CISF नं काम सुरू केलं आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेतल्या कमांडोपासून विमानतळ आणि मेट्रोच्या सुरक्षेचं कामही करू शकतील, असं प्रशिक्षण या महिलांना दिलं जाणार आहे.