March 15, 2025 2:45 PM

views 46

मतदार यादीत फेरफार झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त बैठक घेणार

मतदार यादीत फेरफार झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी येत्या मंगळवारी एक बैठक बोलावली आहे.   या बैठकीत केंद्रीय गृह सचिव, विधिमंडळ सचिव, तसंच आधार प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत मतदार ओळखपत्र आधार ओळखपत्राला जोडण्याबाबतच्या मुद्द्यावर विस्तृत चर्चा होईल. मतदार यादी आधार ओळखपत्रांना ऐच्छिकरीत्या जोडण्याची तरतूद या संदर्भातल्या कायद्यात आहे.

February 19, 2025 9:40 AM

views 390

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारला

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारला. राजीव कुमार यांचा निवडणूक आयोगाच्या प्रमुखपदाचा कार्यकाळ संपल्यामुळे ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्ञानेश कुमार यांनी यापूर्वी संसदीय कामकाज मंत्रालयात सचिवपदाची जबाबदारी सांभाळली होती.