March 30, 2025 9:05 PM

views 58

छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यातल्या ५० माओवाद्यांचं आत्मसर्पण

छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यातल्या ५० माओवाद्यांनी आज आत्मसर्पण केलं. यात प्रत्येकी ६८ लाख रुपये इनाम असणाऱ्या १४ नक्षलींचा समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सैन्य आणि प्रशासनानं दुर्गम खेड्यात केलेल्या सुविधांमुळे प्रभावित होऊन या नक्षलींनी आत्मसर्पण केल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.     या नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आनंद व्यक्त केला आहे. इतर नक्षलवाद्यांनाही हिंसाचार सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचं आवाहन शहा यांनी समाज माध्यमावर केलं...