November 27, 2025 1:22 PM

views 34

चाणक्य संरक्षण संवाद २०२५ मध्ये राष्ट्रपती मुर्मू यांचं संबोधन

देशाची सैन्यदलं अतिशय देशभक्तीने तसंच कार्यक्षमतेने देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी सज्ज असतात, अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सैन्यदलांची प्रशंसा केली आहे. नवी दिल्लीत आयोजित चाणक्य संरक्षण संवाद २०२५ मध्ये त्या आज बोलत होत्या. नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशामध्ये देशाच्या दहशतवादविरोधी आणि प्रतिबंधात्मक क्षमतेचा परिचय मिळाला असून भारतीय सैन्यदलांनी ज्या कार्यक्षमतेने आणि नैतिक जाणीव ठेवून लष्करी क्षमता वापरली त्याची जगभरात  नोंद घेतली गेली आहे, असं त्यांनी सांगितल...