December 14, 2024 8:15 PM

views 50

पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी काढलेला ‘दिल्ली चलो’ मोर्चा आज पुन्हा एकदा स्थगित

शेतपिकाला हमीभाव देण्याचा कायदा आणि कर्जमाफी या प्रमुख मागण्यांसाठी पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी काढलेला ‘दिल्ली चलो’ मोर्चा आज पुन्हा एकदा स्थगित करण्यात आला. मोर्चेकरी जमावाने शंभू तपासणी नाका ओलांडण्याचा प्रयत्न करीत असताना हरियाणा पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी अश्रुधूर आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला. त्यात काही शेतकरी जखमी झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान या आंदोलनाचा भाग म्हणून गेले १८ दिवस उपोषण करणारे शेतकरी नेते जगजीत सिंग दल्लेवाल यांना वैद्यकीय सहाय्य देण्याचे ...