July 22, 2025 7:08 PM

views 28

२०२७ मधे सुरु होणाऱ्या जनगणनेच्या दृष्टीनं प्रशासनाची तयारी सुरु

२०२७मधे सुरु होणाऱ्या जनगणनेच्या दृष्टीनं प्रशासनाची  तयारी सुरु झाली असल्याची माहिती केंद्रसरकारने आज लोकसभेत दिली. केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांनी एका लेखी उत्तरात सांगितलं की गेल्या ३ आणि ४ जुलै रोजी नवी दिल्ली इथं संबंधित अधिकाऱ्यांची परिषद झाली. त्यात जनगणनेच्या प्रक्रीयेबाबत चर्चा झाली. त्यात प्रशासकीय आस्थापना निश्चित करणं, मोबाईल ॲपद्वारे माहिती गोळा करणं, आणि इतर कार्यपद्धतीचा समावेश होता.

June 16, 2025 1:39 PM

views 57

२०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेची अधिसूचना जारी

२०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेची आणि पहिल्यांदाच समाविष्ट झालेल्या जातनिहाय जनगणनेची अधिकृत अधिसूचना आज राजपत्रात प्रसिद्ध झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल दिल्लीत यासंदर्भातल्या तयारीचा आढावा घेण्यात आला.   देशभरात ३४ लाख प्रगणक आणि निरीक्षक, एक लाख तीन हजारांहून जास्त अधिकारी आधुनिक मोबाईल डिजिटल प्रणालीद्वारे या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरांची यादी, मालमत्ता आणि सुविधा या माहितीचं संकलन, दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक-...