June 19, 2025 12:38 PM

views 94

जेजुरी-मोरगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू तर ५ जण जखमी

पुण्याजवळ जेजुरी-मोरगाव रस्त्यावर काल संध्याकाळी भरधाव टेम्पो आणि चारचाकी गाडीच्या अपघातात ८ जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले. जखमींना जेजुरीच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.   या अपघाताबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, तर जखमींना ५० हजार रुपये दिले जातील, अशी घोषणा केली आहे.

April 22, 2025 3:14 PM

views 70

भंडारा जिल्ह्यात २ गाड्यांची टक्कर होऊन झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यात पाथरी इथं काल रात्री एक दुचाकी आणि चारचाकी गाडीची टक्कर होऊन झालेल्या अपघातात ४ जण मृत्युमुखी पडले. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

July 1, 2024 2:55 PM

views 64

यवतमाळ नागपूर महामार्गावर चापरदा गावाजवळ झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू

यवतमाळ नागपूर महामार्गावर चापरदा गावाजवळ झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे ४ च्या सुमारास वेगवान इनोव्हा गाडी आणि ट्रकवर धडकून हा भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या इनोव्हा कारमधील प्रवासी पंजाबहून नांदेडच्या गुरुद्वारा साहेब इथे दर्शनासाठी जात होते.  

June 24, 2024 1:01 PM

views 53

लोणेरे श्रीवर्धन मार्गावर कार अपघातात ३ जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातील लोणेरे श्रीवर्धन मार्गावर काल संध्याकाळी एक भरधाव कार झाडाला आदळून उलटल्यानंतर त्यातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका मुलाचा समावेश आहे, तर एक लहान मुलगा गंभीर जखमी आहे. अन्य दुर्घटनेत अलिबाग तालुक्यातील मुनवली इथं तलावात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. यापैकी एका मुलाच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे.