November 1, 2025 10:40 AM

views 53

‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’ या मोहिमेअंतर्गत भारताचे तीन गिनीज विश्व विक्रम

'स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान' या मोहिमेअंतर्गत भारताने तीन गिनीज विश्व विक्रम केले आहेत. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या या मोहिमेत लोकांचा अभूतपूर्व असा सहभाग दिसून आला.   या उपक्रमाने अनेक विक्रम प्रस्थापित केलेअसून एकाच महिन्यात सर्वाधिक 3 कोटी 21 लाख लोकांची आरोग्य सेवा नोंदणी या अभियानात झाली आहे.

August 12, 2025 7:33 PM

views 52

राज्यभरात तिरंगा मोहिमेंतर्गत रॅली,स्पर्धा आणि विविध उपक्रमांचे आयोजन

देशाच्या एकतेचं निदर्शक असलेल्या हर घर तिरंगा अभियानानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत. ठिकठिकाणी तिरंगा ध्वज घेऊन पदयात्रा काढण्यात येत आहेत तसंच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. पनवेल महानगर पालिकेमार्फत 'हर घर तिरंगा’ मोहिम विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात राबवली जात आहे. या मोहिमेंतर्गत नुकतीच महापालिका कार्यक्षेत्रातल्या विविध शाळा महाविद्यालयांमध्ये पत्रलेखन स्पर्धा, प्रश्नमंजुषा, प्रतिज्ञा घेण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी इथं आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्य...

October 18, 2024 10:01 AM

views 52

ऑनलाइन गैरव्यवहारांच्या वाढत्या धोक्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी स्कॅम से बचो अभियान सुरू

ऑनलाइन गैरव्यवहारांच्या वाढत्या धोक्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार आणि मेटा कंपनीनं स्कॅम से बचो हे अभियान सुरू केलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, गृह मंत्रालय तसंच भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र यांनी मिळून या अभियानाचा आराखडा निश्चित केला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या उपस्थितीत या अभियानाचा काल नवी दिल्लीत प्रारंभ करण्यात आला.   डिजिटल सुरक्षा आणि सतर्कता याबाबतच्या सरकारच्या दृष्टीकोनाचं प्रतिबिं...