February 1, 2025 2:00 PM

views 60

आकांक्षित जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेची घोषणा

देशभरातल्या शंभर आकांक्षित जिल्ह्यांमध्ये राज्यांच्या सहकार्याने प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना राबवणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडताना लोकसभेत सांगितलं. उत्पादन वाढवणं, शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करणं, पंचायत आणि गट स्तरावर साठवणुकीची क्षमता वाढवणं, सिंचन सुविधा सुधारणं, दीर्घकालीन आणि अल्पकालीन कर्ज उपलब्ध करून देणं हे याचं उद्दिष्ट आहे. याचा लाभ दीड कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना होणार आहे. किसान क्रेडिट कार्डद्वारे साडे सात कोटींपेक्षा जास्त शेतकरी, मच्छिमार आणि दूध उत्पादक शेतकऱ...

February 1, 2025 1:55 PM

views 65

१२ लाखापर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त, त्यापुढील उत्पन्नावरच्या करांच्या दरातही कपात

पुढच्या आठवड्यात नवीन आयकर विधेयक आणण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी आज केली. टॅक्स रिबेटच्या सोयीमुळं १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना नवीन कर रचनेनुसार कुठलाही आयकर द्यावा लागणार नाही, अशी मध्यमवर्गासाठी खूषखबर त्यांनी आजच्या भाषणात दिली. नोकरदारांना ७५ हजार रुपयांचं standard deduction मिळत असल्यानं त्यांना पावणे १३ लाख रुपयांच्या उत्पन्नावर काहीही आयकर द्यावा लागणार नाही.   नवीन कर रचनेत असलेल्या करांच्या दरांमध्येही सुधारणा त्यांनी आज जाहीर केल्या. त्यानुसार आता ४ लाख रुपयांपर्यंत उत...

February 1, 2025 1:54 PM

views 74

गरीब, युवा, शेतकरी आणि महिलांना प्राधान्य देणारा, सर्वांचा विकास साधणारा अर्थसंकल्प

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर केला. या माध्यमातून येत्या ५ वर्षात सर्वांचा विकास करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यात गरीब, युवा, शेतकरी आणि महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे. आर्थिक वृद्धीला चालना, सर्वंकष विकास, खासगी क्षेत्राच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन, सर्वसामान्यांच्या आकांक्षांना उभारी देणारा आणि मध्यमवर्गाला आणखी बळकट करणारा हा अर्थसंकल्प असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. हा अर्थसंकल्प कर निर्धारण, ...

January 30, 2025 8:34 PM

views 63

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं सुरुवात होईल. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला त्या संबोधित करतील. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या शनिवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्तावावर दोन्ही सभागृहात चर्चा होईल. त्यानंतर अर्थसंकल्पावर १३ फेब्रुवारीपर्यंत चर्चा होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र १० मार्चपासून सुरू होईल. या अधिवेशनात १६ विधे...