August 14, 2024 11:41 AM

views 49

मुंबई महानगरपालिकेत प्रभाग स्तरावर ‘तिरंगा यात्रा’

मुंबई महानगरपालिकेत प्रभाग स्तरावर ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली. महानगरपालिका मुख्यालय ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत निघालेल्या तिरंगा यात्रेत, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सहभागी झाले होते. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीही ठिकठिकाणच्या तिरंगा यात्रांमध्ये सहभाग नोंदवला. नागपूर इथं काल घेतलेल्या तिरंगा मॅरेथॉनमध्ये नागरीक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

July 29, 2024 7:53 PM

views 51

मुंबई महानगरपालिका पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आदित्य ठाकरे यांचा आरोप

मुंबई महानगरपालिकेने यावर्षी सहा हजार कोटींच्या निविदा काढल्या, मात्र गेल्यावर्षी निविदा काढलेलं एकही काम झालेलं नसून पालिका पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. मागच्या वर्षी निविदा काढलेली किती कामं पूर्ण झाली, ज्या कंत्राटदारांना दंड ठोठावण्यात आला होता तो आकारण्यात आला का, असा सवालही ठाकरे यांनी विचारला. काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारांना पालिकेनं काम दिल्याचा आरोपही त्यांनी केला. रा...

June 25, 2024 7:30 PM

views 83

‘बेस्ट’ बससेवेला आर्थिक सहाय्य करण्याची आमदार आदित्य ठाकरे यांची मागणी

मुंबईतल्या ‘बेस्ट’ बस सेवेला आर्थिक सहाय्य करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना पत्रद्वारे केली आहे. गेल्या दोन वर्षांत बेस्टकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला. बेस्ट बसची भाडेवाढ करू नये, कर्मचाऱ्यांना वेतन आणि निवृत्तीवेतन वेळेवर मिळावं आणि बसच्या संख्येतली नियोजित वाढ तातडीन अमलात आणावी अशा मागण्याही ठाकरे यांनी या पत्राद्वारे केल्या आहेत.