September 16, 2024 7:47 PM

views 38

मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते भारत स्टार्टअप नॉलेज ऍक्सेस रजिस्ट्रीचं (भास्कर) अनावरण

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी आज नवी दिल्ली इथं भास्कर अर्थात भारत स्टार्टअप नॉलेज ऍक्सेस रजिस्ट्रीचं अनावरण केलं. स्टार्ट अप्स, गुंतवणूकदार, सेवा प्रदाते आणि नियंत्रक यांच्यात परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठई भास्कर उपयोगी पडणार आहे. स्टार्टअप उद्योगामध्ये भारताला जागतिक केंद्र बनवण्याचं आवाहन पियूष गोयल यांनी यावेळी केलं. हे ऑनलाईन व्यासपीठ या क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी प्रेरणा ठरेल असंही ते म्हणाले. 

September 16, 2024 9:48 AM

views 39

स्टार्टअप्स परिसंस्थेला बळ देण्यासाठी भास्कर या नव्या डिजीटल मंचाची सुरुवात

देशातल्या स्टार्टअप परिसंस्थेला बळकट करण्याच्या उद्देशाने उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभाग म्हणजेच DPIIT कडून भास्कर नावाच्या डिजीटल मंचाची सुरुवात करण्यात येणार आहे. भारत स्टार्टअप नॉलेज अॅक्सेस रजिस्ट्री म्हणजेच भास्कर हा मंच उद्योजकीय परिसंस्थेतील प्रमुख भागधारकांमधलं सहकार्य केंद्रीकृत, सुव्यवस्थित आणि वृद्धींगत करण्याच्या उद्देशानं हा मंच स्थापन करण्यात आला आहे.   हा उपक्रम भारताला नवोन्मेष आणि उद्योजकता क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्याच्या सरकारच्या दृष्टीकोनाशी सुसंगत कार्य कर...