November 15, 2025 1:44 PM

views 82

बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त देशात आदिवासी गौरव दिवस साजरा

आदिवासी समुदायाचे नेते, आणि स्वातंत्र्य सेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी  देशभरात आज आदिवासी गौरव दिवस साजरा होत आहे. आजचा दिवस आदिवासी संस्कृतीच्या गौरवशाली इतिहासाचं महत्व अधोरेखित करतो. गेल्या काही वर्षांमध्ये आदिवासी  गौरव सप्ताहाचं स्वरूप घेतलेल्या या उत्सवात देशभर विविध  सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शनं आणि शैक्षणिक उपक्रम आयोजित केले जातात.  यंदा भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती आहे.    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि लोकसभा...