January 23, 2026 6:07 PM

views 189

बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कल्याणकारी योजना राबवणार – उपमुख्यमंत्री शिंदे

शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यात विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त आज मुंबईत आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. घरोघरी आरोग्य तपासणीची सुविधा देणारी आरोग्य आपल्या दारी मोहीम प्रथम मुंबईत आणि नंतर राज्यात इतरत्र राबवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं.  प्लास्टिक मुक्त गड किल्ले अभियान जागतिक वारसा यादीतल्या ११ किल्ल्यांवर आणि नंतर इतर किल्ल्यांवर चालवण्यात येणार आहे. त्य...

January 23, 2026 1:26 PM

views 117

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय परिदृश्याला आकार देणाऱ्या बाळासाहेबांचं जनतेशी अनोखं नातं होतं, विविध मुद्द्यांवर ते आपली मतं निडरपणे व्यक्त करत असत, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.    ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव  बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी  आज दक्षिण मुंबईतल्या  ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर...