November 11, 2024 4:00 PM

views 13

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मुख्य आरोपी शिवकुमारला उत्तर प्रदेशातून अटक

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी शिवकुमार याला उत्तर प्रदेशातल्या बहराईच इथून अटक करण्यात आली आहे. लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंध असल्याचं शिवकुमारनं पोलिसांनी केलेल्या चौकशीत कबूल केलं आहे. शिवकुमारला मदत करणारे अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेशेंद्र प्रताप सिंह यांनाही अटक करण्यात आली आहे.