October 24, 2024 2:39 PM

views 63

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी बिश्नोई टोळीशी संबंधित प्रवीण लोणकरला अटक

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात  लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित प्रवीण लोणकरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीणचा लोणकरचा भाऊ शुभम हा अद्यापही फरार असून पोलिस त्याच्या शोधात आहेत. शुभमच्या संपर्कात असलेल्या चौघांना मुंबई पोलिसांनी काल चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं, तर पुण्यातून आणखी तिघांना काल रात्री ताब्यात घेतलं आहे.

October 19, 2024 1:21 PM

views 56

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ९ जणांना अटक

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ९ जणांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षारक्षकाला निलंबित केलं आहे. सुरक्षेसाठी तैनात असतांनाही त्याने हल्लेखोरांवर गोळीबार न करुन कर्तव्यात कसुर केल्याबद्दल कॉन्टेबल शाम सोनवणे याला निलंबित करण्यात आलं आहे. हल्लेखोरांनी मिरची पावडरच्या स्प्रेचा व धुराचा वापर केल्यामुळे गोळीबार करता न आल्याचं त्याने आपल्या जबानीत म्हटलं आहे. या हत्याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आमदार जीशान सिद्दीकी या...

October 13, 2024 7:24 PM

views 59

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी दोन जणांना अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई  पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. गुरमैल सिंग आणि धर्मराज कश्यप या दोन आरोपींना आज किल्ला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्यापैकी गुरमैल सिंग याला येत्या २१ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली तर धर्मराज कश्यप याच्या वयाची चाचणी झाल्यानंतर त्याला पुन्हा हजर करण्याचे आदेश न्यायालयानं पोलिसांना दिले आहेत.    मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची १५ पथकं सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास...