April 12, 2025 12:39 PM

views 74

केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांच्या हस्ते ओडिशात आयुषमान भारत योजनेचा शुभारंभ

केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांच्या हस्ते काल ओडिशात आयुषमान भारत योजनेचा शुभारंभ झाला. गेल्या सहा वर्षात गरिबांच्या उपचारांवर सव्वा लाख कोटी रुपये खर्च केल्याचं सांगून नड्डा यांनी ओडिशा राज्य सरकारच्या गोपबंधू जन आरोग्य योजनेसमवेत आयुषमान भारत ही योजनाही राबवण्यात येणार असून यासाठी केंद्रासोबत एक सामंजस्य करार केला आहे. या एकत्रीकरणामुळे, राज्यातील आदिवासी नागरिकांसह साधारणपणे एक कोटी कुटुंबांमधील सुमारे साडेतीन कोटी लोकांना या एकत्रित योजनेअंतर्गत सामावून घेतले जाईल.

February 21, 2025 9:30 AM

views 75

दिल्ली सरकार आयुष्मान भारत आरोग्य विमा योजना लागू करणार

दिल्ली सरकारनं आयुष्मान भारत आरोग्य विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल संध्याकाळी पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.   दिल्ली सरकारनं आयुष्मान भारत योजनेसह पाच लाख रुपयांच्या निधीला एकमतानं मंजुरी दिली असून ती लवकरच लागू करण्यात येईल, असं ही गुप्ता यांनी यावेळी सांगितलं. विधानसभेच्या पहिल्या बैठकीत नियंत्रक आणि महालेखा परीक्षक अर्थात कॅगचे १४ अहवाल मांडले जातील अशी माहिती त्यांनी दिली.   तत्पूर्व...