October 13, 2025 2:55 PM

views 84

ऑस्ट्राहिंद २०२५ या युद्धसरावासाठी भारतीय सैन्यपथक ऑस्ट्रेलियात दाखल

ऑस्ट्रेलियाच्या सैन्यासोबत होणाऱ्या ऑस्ट्राहिंद २०२५ या युद्धसरावात सहभागी होण्यासाठी भारतीय सैन्याच्या १२० जवानांचं पथक ऑस्ट्रेलियात दाखल झालं आहे. हा सराव संरक्षण सहकार्य आणि परस्पर विश्वासाची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने होत असल्याचं कॅनबेरा इथल्या भारतीय उच्चायुक्तालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.   हा सराव खुल्या आणि निमवाळवंटी प्रदेशातल्या युद्धांवर केंद्रित असेल. या सरावात सैन्याचं नियोजन, सामरिक कवायती आणि विशेष शस्त्रास्त्र कौशल्य यांचा समावेश असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात...