November 15, 2024 10:53 AM

views 86

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठीकठिकाणी मतदान जनजागृती अभियान

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठीकठिकाणी मतदान जनजागृती अभियानही राबवलं जात आहे. धाराशिव जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीनं काल ‘वॉक फॉर व्होट’ या प्रभात फेरीचं आयोजन केलं होतं. शहरातल्या सर्व शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी यात मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. तुळजापूर इथं विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून मतदान जनजागृती केली. हिंगोली जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी दुचाकी फेरी काढण्यात आली. परभणी शहरात काल ‘रन फॉर वोट’ ही फेरी काढण्यात आली. महाबळेश्वर तालुक्यात मतदान जनजागृती रथाच्या माध्यमातून नाग...

November 15, 2024 11:51 AM

views 54

राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला

राज्यात विधानसभा प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. सर्वच पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या झंजावाती प्रचार दौऱ्यामुळे राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे. त्याचवेळी ठिकठिकाणचे उमेदवार आणि कार्यकर्ते कोपरा सभा, मेळावे, प्रचार फेऱ्या आणि घरोघरी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेत आहेत. कालही विविध पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांच्या राज्यात प्रचार सभा झाल्या.   प्रचार महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. सर्वच पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या झंजावाती प्रचार दौऱ्याम...

November 10, 2024 6:17 PM

views 75

महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी हाती सत्ता द्या, राज ठाकरेंचं आवाहन

पुणे शहरातही आज विविध पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. मला खुर्चीचा किंवा सत्तेचा सोस नाही, तर महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करायचंय, म्हणून माझ्या हाती एकदा सत्ता द्या, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ते आज पुण्यात आयोजित प्रचार सभेत बोलत होते.    गेल्या पाच वर्षातलं राजकारण आणि नेतेमंडळींचे वागणं किळसवाणं आहे. हे असंच चालू राहिलं, तर येत्या काळात महाराष्ट्राचं आणखी वाटोळं होईल, अशी टीका त्यांनी केली.

November 9, 2024 7:10 PM

views 64

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीसाठी राज्यात विविध कार्यक्रम आयोजित

मुंबईत अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात आज सकाळी ‘सायकल रॅली’ आणि पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. विलेपार्ले इथल्या दुभाषी मैदानातून सायकल रॅलीची सुरुवात झाली. यावेळी रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांना ‘स्वीप’ उपक्रमा अंतर्गत मतदान करण्यासाठी शपथ देण्यात आली.   स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी मुंबईत घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर आज पथनाट्य सादर करुन नागरिकांना त्यांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढवण्याबाबत आवाहन करण्यात आलं.   नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज मतदानाबाबत सामुहिक प्...

November 9, 2024 5:14 PM

views 70

घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर पथनाट्य सादर करुन नागरिकांना मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढवण्याबाबत आवाहन

विधानसभा निवडणूकीच्या निमित्तानं स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी 'उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा' हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. मुंबईत घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर आज पथनाट्य सादर करुन नागरिकांना त्यांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढवण्याबाबत आवाहन करण्यात आलं.   स्वीप उपक्रमांतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज मतदानाबाबत सामुहिक प्रतिज्ञा केली. महापालिकेच्या मुख्यालयातल्या ज्ञानकेंद्रात झालेल्या या शपथ ग्रहण सोहळ्याला महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदेही उपस्थित होते.

November 8, 2024 7:25 PM

views 50

महाराष्ट्राच्या विकासाला महायुती सरकारच चालना देऊ शकेल – प्रधानमंत्री

विधानसभा निवडणुकांसाठीच्या  प्रचाराने वेग घेतला आहे.  भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज धुळ्यात जाहीर सभा घेतली. महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याचं काम केवळ महायुतीचं सरकारच करु शकतं असं त्यांनी सांगितलं. महिला सक्षमीकरण, युवकांना रोजगार, आदिवासींचे हक्क इत्यादी क्षेत्रात युती सरकारने राबवलेल्या योजनांचा उल्लेख त्यांनी केला.  महाविकास आघाडीने अनेक विकासप्रकल्पांच्या मार्गात खोडा घातला असा आरोप त्यांनी केला.   मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आपल्या सरकारने मिळवून दिल्...

November 7, 2024 6:14 PM

views 195

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा प्रसिद्ध

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज मुंबई इथून आपला वचननामा प्रसिद्ध केला. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी या वचननाम्याचं प्रकाशन झालं. संस्कार, अन्नसुरक्षा, महिला, आरोग्य, शिक्षण, पेन्शन, शेतकरी, वंचित समूह, उद्योग तसंच मुंबईच्या विकासासाठी असलेलं धोरण या प्रमुख घटकावर आधारीत हा वचननामा आहे. हा आपल्या पक्षाचा वचननामा असून महाविकास आघाडीचा सविस्तर जाहीरनामा लवकरच जाहीर होईल, असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. यावेळ...

November 7, 2024 10:42 AM

views 51

विधानसभेसाठी महाराष्ट्रातील राजकीय पक्षांकडून प्रचाराला वेग

विधानसभेसाठी महाराष्ट्रात सगळ्याच राजकीय पक्षांकडून प्रचाराला वेग आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन एकजुट होऊन हिंदूंनी राष्ट्रविरोधी शक्तीच्या विरोधात लढा द्यावा असं आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल वाशिम इथं जाहीर सभेत केलं. महाविकास आघाडीद्वारे लोकसेवेची पंचसुत्री काल मुंबईत वांद्रे इथं झालेल्या संयुक्त जाहीर सभेत प्रकाशित करण्यात आली.   शेतकऱ्यांचे 3 लाखापर्यंतचं कर्जमाफ, महिलांना 3000 रुपये महिना आणि मोफत बसप्रवास, बेरोजगारांना 4 हजार रुपये महिन...

November 4, 2024 2:56 PM

views 58

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ८ नोव्हेंबरपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ८ ते १४ नोव्हेंबर दरम्यान ११ सभा घेणार आहेत धुळे, नाशिक, अकोला, नांदेड, चंद्रपूर, चिमूर, सोलापूर, पुणे छत्रपती संभाजीनगर नवी मुंबई आणि मुंबई इथं या सभा होतील, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

November 3, 2024 6:33 PM

views 69

मनोज जरांगे पाटील यांचीआंतरवाली सराटी इथं सहकाऱ्यांसोबत बैठक

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीबाबतचा अंतिम निर्णय घेण्यासाठी आज आंतरवाली सराटी इथं सहकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या निवडणुकीत कोणत्या जागा लढवायच्या याबाबत या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. ज्या जागा जिंकून येणं शक्य आहे तिथंच उमेदवार देऊ आणि इतर ठिकाणी आपल्याला त्रास देणाऱ्यांचा पराभव करू, अशी भूमिका जरांगे यांनी यावेळी मांडली. मराठवाड्यातल्या जालना, भोकरदन, बीड, केज, फुलंब्री, कन्नड आणि हिंगोली या मतदारसंघांमध्ये उमेदवार देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.