October 13, 2024 1:09 PM

views 34

आशियाई टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरी प्रकारात ऐहिका मुखर्जी आणि सुतीर्था मुखर्जी या जोडीने पटकावलं कास्यपदक

कझाकस्तानमध्ये अस्ताना इथं सुरु असलेल्या आशियाई टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरी प्रकारात भारताच्या ऐहिका मुखर्जी आणि सुतीर्था मुखर्जी या जोडीनं इतिहास रचत कास्यपदक पटकावलं आहे. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीमध्ये पदक मिळवणारी ऐहिका आणि सुतीर्था ही पहिलीच भारतीय जोडी आहे. उपांत्य फेरीच्या आज झालेल्या सामन्यात जपानच्या मिवा हरिमोटो आणि मियुउ किहाराया या जोडीनं भारतीय जोडीचा पराभव केला. त्यामुळे भारताला कास्यपदकावर समाधान मानावं लागलं. 

October 12, 2024 3:54 PM

views 41

आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत अहिका मुखर्जी आणि सुतीर्थ मुखर्जी यांची उपान्त्य फेरीत धडक

कझाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या आशियाई टेबल टेनिस स्पर्धांमध्ये भारताच्या अहिका मुखर्जी आणि सुतीर्थ मुखर्जी यांनी आज महिला दुहेरीच्या उपान्त्य फेरीत धडक मारली आहे. यामुळं त्यांचं पदक निश्चित झालं आहे. उपान्त्यपूर्व फेरीत त्यांनी दक्षिण कोरियाच्या किम न्योंग आणि ली युन्हये या जोडीचा ३-१ असा पराभव केला. अहिका-सुतीर्थ उपान्त्य फेरीत आता जपानच्या मिवा हरिमोटो आणि मियु किहारा या जोडीशी खेळणार आहेत. दरम्यान, पुरुष एकेरीत मानुष शाह आणि मानव ठक्कर यांनी १६ व्या फेरीत प्रवेश केला. तर हरमीत देसाईला दक्षिण क...