May 30, 2025 10:09 AM

views 17

Athletics Championships : भारताच्या अविनाश साबळेला सुवर्ण पदक

दक्षिण कोरियात सुरू असलेल्या आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या अविनाश साबळेनं काल 3 किलोमीटर अडथळ्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक पटकावलं. अवघ्या आठ मिनिट 20 सेकंद आणि 90 मिनी सेकंदात त्यानं ही शर्यत पूर्ण केली. यापूर्वी 2019 मध्ये दोहा इथं झालेल्या स्पर्धेत अविनाश साबळेनं रौप्य पदक पटकावलं होतं.

May 29, 2025 3:45 PM

views 32

Asian Athletics Championships : भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघाला मिश्र रिले स्पर्धेत सुवर्णपदक

दक्षिण कोरियात गुमी इथं सुरु असलेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघानं मिश्र रिले स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. भारतीय संघाकडून रूपल चौधरी, संतोष कुमार तमिलारासन, विशाल टीके आणि सुभा वेंकटेशन यांनी चमकदार कामगिरी केली. भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. चीन दुसऱ्या तर श्रीलंका तिसऱ्या स्थानावर राहिला.