December 25, 2025 11:29 AM

views 57

भारतीय पुरुष हॉकी संघाचा उपकर्णधार हार्दिक सिंहला मेजर ध्यान चंद खेल रत्नसाठी नामांकन

हार्दिकनं, 2020 मध्ये टोक्यो आणि 2024 मध्ये पॅरिस ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकण्यात महत्वाचं योगदान दिलं आहे. दरम्यान, 24 क्रीडापटूंना अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. यामध्ये प्रथमच योगासनासाठी आरती पाल, रायफल साठी मेहुली घोष, महिला बॅडमिंटन जोड़ी ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचाही समावेश आहे.  

September 7, 2025 1:31 PM

views 37

भारताचा आशिया करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश

 बिहार इथे सुरू असलेल्या आशिया कप हॉकी स्पर्धेच्या सुपर फोर फेरीत भारतीय संघाने चीनचा ७ - ० ने धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली आहे. आता अंतिम सामन्यात भारताचा सामना कोरियाशी होणार आहे. सुपर फोर फेरीत मिळवलेल्या विजयामुळे सात गुणांसह भारत गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. या स्पर्धेतल्या विजेत्या संघाला पुढच्या वर्षी होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्याची संधी मिळेल.