August 7, 2026 2:45 PM

views 11

सुरक्षा उपाययोजनांमुळे रेल्वे अपघातांत लक्षणीय घट : अश्विनी वैष्णव

गेल्या काही वर्षांत राबवण्यात आलेल्या विविध सुरक्षा उपाययोजनांमुळे रेल्वे अपघातांची संख्या लक्षणीयरित्या घटल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.   गेल्या पाच आर्थिक वर्षांत रेल्वे सुरक्षिततेशी संबंधित कामांवर पाच लाख ४१ हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली. परिणामी रेल्वे अपघातांची संख्या २०१४-१५मध्ये १३५वरून कमी होऊन २०२६-२७मध्ये फक्त दोन इतकी नोंदवली गेल्याचं ते म्हणाले.