November 29, 2025 4:51 PM

views 41

नव्या कामगार कायद्यांवर अरविंद सावंत यांची टीका

केंद्र सरकारच्या चार नव्या कामगार कायद्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी टीका केली आहे. हे कायदे कामगारांचे अधिकार नष्ट करून अनिश्चितता तयार करतील, असे सावंत म्हणाले. भारतीय कामगार सेना या कायद्यांच्या अंमलबजावणीला विरोध करेल. या कायद्यांना न्यायालायात आव्हान दिले जाईल, असे त्यांनी माध्यमांना सांगितले.