December 12, 2025 3:29 PM

views 39

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील अहवाल दोन महिन्यात सादर करण्याचे निर्देश

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिज ईटीएस मोजणी अहवाल दोन महिन्यात सादर करण्याचे निर्देश विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आज दिले. या प्रकल्पात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून सरकारचा ६०० कोटींचा महसूल बुडाल्याची तक्रार अमोल कोमावर यांनी केली होती.   या प्रकरणी विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात आज बैठक झाली, यावेळी तहसीलदार, मंडळ अधिकारी, भूमी अभिलेख, रेल विकास निगम यांनी एकत्रित समिती तयार करून ईटीएस मोजणी अहवाल सादर करावा असे निर्देश उपाध्यक्षांनी दिले. 

March 26, 2025 3:40 PM

views 182

राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष

विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून अण्णा बनसोडे यांची नियुक्ती झाल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज केली. या पदासाठी बनसोडे यांचा एकमेव अर्ज आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला आणि सर्व सदस्यांनी एकमताने त्याला मंजुरी दिली. बनसोडे हे आमदार म्हणून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत.   उत्तराखंडमध्ये झालेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, नवी दिल्लीत झालेल्या खोखो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष सं...