October 29, 2025 1:40 PM

views 464

मोंथा वादळ पूर्व किनाऱ्यावर धडकलं, वादळाच्या प्रभावामुळे अनेक राज्यांमधे मुसळधार पाऊस

मोंथा चक्रीवादळ काल रात्री ९० ते १०० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने आंध्र प्रदेश आणि यानम इथल्या किनाऱ्यावरून मछलीपट्टणम आणि कलिंगपटणमच्या मधून पुढे सरकलं. किनारपट्टीवर धडकल्यानंतर मोंथाची तीव्रता कमी झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशातल्या श्रीकाकुलम, विशाखापट्टण, नेल्लोर, काकिनाडा जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झालं. कोनासीमा इथं सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड पडून एकाचा मृत्यू झाला. वादळामुळे ४८ हजार हेक्टरवरची पिकं आणि जवळपास दीड लाख हेक्टरवरच्या फळबागांना मोठा फ...

October 16, 2025 8:33 PM

views 113

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंध्रप्रदेशात विविध विकासकामांचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आंध्रप्रदेशातल्या कुरनूल इथं १३ हजार ४३० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. उद्योग, ऊर्जा, रस्ते, रेल्वे, संरक्षण उत्पादन तसंच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूू क्षेत्रातील हे प्रकल्प आहेत.     देशातल्या प्रत्येक गावात वीज पोहोचली असून वीज वापर १४०० युनिटनं वाढल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. ऊर्जा क्षेत्रात भारत नवे मापदंड तयार करत आहे, असंही प्रधानमंत्री म्हणाले. यावेळी प्रधानमंत्र्यांनी विशाखापट्टणम इथं उभारल्या जाणाऱ्या एआय हब...

October 16, 2025 2:28 PM

views 85

प्रधानमंत्र्यांनी आंध्रप्रदेशातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला केलं अभिवादन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आंध्रप्रदेशातील श्रीशैलम इथं श्री शिवाजी स्फुर्ती केंद्रम इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ध्यानस्थ मूर्तीला अभिवादन केलं.   यावेळी प्रधानमंत्र्यांनी श्री शिवाजी स्फुर्ती केंद्रामधल्या शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची ओळख करून देणाऱ्या शिल्प, प्रतिमा आणि मूर्तींची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबु नायडू, पवन कल्याण उपस्थित होते. त्याआधी मोदी यांनी भ्रमरंबा मल्लिकार्जून स्वामी वरला देवस्थानमला भेट दिली.    प्रधानमं...

October 9, 2025 1:25 PM

views 78

आंध्र प्रदेशातल्या ग्रामीण स्थानिक स्वराज संस्थांसाठी अनुदान जारी

पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत आंध्र प्रदेशातल्या ग्रामीण स्थानिक स्वराज संस्थांसाठी चालू आर्थिक वर्षातलं  अनुदान केंद्र सरकारने आज जारी केलं.  अनुदानाचा चार हजार कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित झाल्याचं पंचायत राज मंत्रालयानं सांगितलं. या अनुदानाचा फायदा १३ जिल्हा परिषद, ६५० पंचायत समिती आणि १३ हजाराहून जास्त ग्रामपंचायतींना होईल, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. 

October 8, 2025 7:45 PM

views 79

आंध्रप्रदेशातल्या फटाक्यांच्या कारखान्यात लागलेल्या आगीत ६ कामगारांचा मृत्यू

आंध्रप्रदेशातल्या कोन्नासीमा जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखान्यात लागलेल्या आगीत ६ कामगार भाजून मरण पावले तर काही जण जबर जखमी झाले.जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.  लक्ष्मी गणपती कारखान्यात ही  घटना घडली. फटाक्याच्या दारूने झालेल्या या स्फोटात कारखान्याचं  छपरं कोसळलं. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून आवश्यक ती सर्व मदत पोहोचती केल्याचं म्हटलं आहे.