November 19, 2025 3:27 PM

views 96

सत्यसाईबाबा यांचं जन्मशताब्दी वर्ष जागतिक शांतता, प्रेमाचं महापर्व असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

सत्यसाईबाबा यांचं जीवन वसुधैव कुटुंबकम याचं उदाहरण आहे. त्यामुळे त्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष जागतिक शांतता, प्रेमाचं महापर्व असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज काढले. आंध्र प्रदेशातल्या पुट्टपर्थी इथं श्री सत्यसाईबाबा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.    या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सत्य साई बाबा यांच्या सन्मानार्थ काढलेल्या विशेष नाण्याचं आणि टपाल तिकीटाचं प्रकाशन झालं. सत्यसाईबाबांनी अध्यात्माला जनसेवेशी जोडले. मानव सेवा ही मा...

November 19, 2025 1:19 PM

views 94

आंध्रप्रदेशातल्या रामपाचोदावरम इथं आज सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत सहा ते सात नक्षली

आंध्रप्रदेशातल्या रामपाचोदावरम इथं आज सकाळी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत सहा ते सात नक्षली मारले गेले. यात काही वरिष्ठ नक्षली नेत्यांचा समावेश असल्याचं गुप्तचर विभागाचे अतिरिक्त महासंचालक महेश चंद्र लड्डा यांनी वार्ताहरांना सांगितलं.   एनटीआर, कृष्णा, काकिनाडा, एलुरू या जिल्ह्यांमधून जवळपास ५० नक्षलींना अटक केली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि शस्त्रं जप्त करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, आंध्रप्रदेशात छत्तीसगड सीमेवर काल झालेल्या चकमकीत वरिष्ठ नक्षली नेता हिडमा ...

November 1, 2025 8:02 PM

views 86

आंध्रप्रदेशच्या श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरीत ९ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातल्या श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात आज चेंगराचेंगरी होऊन किमान ९ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेतल्या मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि जखमींना लवकर बरं वाटावं, अशी प्रार्थना केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करून मृतांच्या कुटुंबांना २ लाख रुपये नुकसानभरपाई, तर जखमींना ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यायची घोषणा केली. आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस...

October 15, 2025 10:16 AM

views 122

प्रधानमंत्री उद्या आंध्र प्रदेशला भेट देणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते नंद्याल जिल्ह्यातल्या श्रीशैलम इथल्या श्री भ्रमरम्बा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानम इथं पूजा करतील.   ते श्रीशैलममधील श्री शिवाजी स्फूर्ती केंद्रालाही भेट देणार आहेत. तसंच प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कुर्नूलमध्ये सुमारे 13 हजार 430 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात येणार आहे. या दौऱ्यात एका जाहीर सभेला देखील प्रधानमंत्री संबोधित करणार आहेत.

May 4, 2025 8:04 PM

views 107

आंध्रप्रदेशात मुसळधार पाऊस

मुसळधार पावसानं आज आंध्रप्रदेशातल्या एन टी आर, कृष्णा, पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी आणि कोणासीमा या तटवर्ती जिल्ह्यांना  झोडपून का़ढलं आहे. विजयवाडा, एलूरू आणि राजामुंड्री या जिल्ह्यांत सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या अवकाळी पावसाचा परिणाम पश्चिम गोदावरी आणि कृष्णा जिल्ह्यांतल्या आंबा पिकांवर झाला  आहे. दरम्यान, एन टी आर आणि एलूरू जिल्ह्यातले जिल्हाधिकारी  स्थितीवर लक्ष ठेवून असून उन्मळून पडलेले वृक्ष बाजूला करण्याबरोबरच पूर आलेल्या भागात  मदत करत आहेत.

April 30, 2025 4:25 PM

views 77

आंध्र प्रदेशात मंदिराची भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू, १५ जण जखमी

आंध्र प्रदेशात विशाखापट्टणमजवळ सिंहाचलम मंदिरात आज सकाळी दर्शन रांगेजवळची भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले. मुसळधार पावसामुळे एक तंबू कोसळल्यानंतर ही भिंत कोसळली. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलाच्या बचाव पथकांनी  घटनास्थळी मदत कार्य सुरु केलं आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं  असून  आंध्र प्रदेशचे गृहमंत्री आणि जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

January 9, 2025 1:16 PM

views 82

आंध्रप्रदेशमध्ये झालेल्या जीवितहानी बद्दल राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी केला शोक व्यक्त

  आंध्रप्रदेशमध्ये तिरुपती इथल्या चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानी बद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रपतींनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्ट मध्ये मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केली आहे, आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे.   चेंगराचेंगरीत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या प्रति प्रधानमंत्री मोदी यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. दुर्घटनाग्रस्तांना राज्यसरकार सर्वतोपरी मदत करत ...

January 8, 2025 11:00 AM

views 62

आंध्र प्रदेशातील गोदावरी ग्लोबल विद्यापीठात जागतिक तेलुगू परिषदेला सुरुवात

आंध्र प्रदेशातील राजामहेंद्रवरम इथल्या गोदावरी ग्लोबल विद्यापीठात आजपासून जागतिक तेलुगू परिषदेला सुरुवात होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत प्रसिद्ध तेलगू लेखक, साहित्यिक, तसंच माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू; भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन व्ही रमण; दोन्ही तेलगू राज्यांचे राज्यपाल; केंद्र आणि राज्याचे मंत्री, खासदार, कलाकार आणि अभिनेते सहभागी होणार आहेत.

January 8, 2025 9:59 AM

views 63

आंध्र प्रदेशात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज विविध विकास कामांचं लोकार्पण

आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम् इथं आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं लोकार्पण, उद्घाटन तसंच पायाभरणी होणार आहे. एकंदर दोन लाख कोटींहून अधिक किंमतीच्या या प्रकल्पांमध्ये पुडीमाडाका इथल्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहिमेअंतर्गत पहिल्या हरित हायड्रोजन हबचा समावेश आहे. त्यासाठी अंदाजे 1 लाख 85 हजार कोटी गुंतवणूक केली जाणार आहे. यामुळे पुढील पाच वर्षात भारताचं पाचशे गिगावॅट अजीवाश्म ऊर्जा क्षमता गाठण्याची लक्ष्यपूर्ती होणार आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते, साडे एकोणीस हजार कोटी रुपये मूल्य...

September 18, 2024 1:17 PM

views 78

आंध्र प्रदेशातल्या पुरग्रस्त कुटुंबांना मदतीची घोषणा

आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा इथे आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबाना मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी काल मदतीची घोषणा केली. विजयवाडा इथल्या सर्व ३२ प्रभागांमध्ये नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत दिली जाईल, तसंच पूरबाधित घरांची दुरुस्तीही केली जाईल, असं मुख्यमंत्री नायडू यावेळी म्हणाले.    पूरग्रस्त भागात तळमजल्यावर राहणाऱ्या कुटुंबांना प्रतिकुटुंब २५ हजार रुपये, पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबांना १० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. इतर बाधित भागातल्या रहिवाशांनाही १०...