December 12, 2025 1:02 PM

views 43

आंध्र प्रदेशामध्ये एका बस अपघातात ९ जणांचा मृत्यू, तर २२ जण जखमी

आंध्र प्रदेशातल्या अल्लुरी सीता रामाराजू जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या एका बस अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला तर २२ जण जखमी झाले आहेत. तुळसीपाका गावाजवळ चिंतुरू-मरेदुमिल्ली घाट या रस्त्यावरून ही खासगी बस तेलंगणा राज्याकडे जात होती. पोलिसांनी घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू केलं असून गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना भद्राचलम इथल्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.   राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री एन. चंद...