November 23, 2025 7:15 PM

views 131

महाराष्ट्र मंत्रालयातले स्वीय सचिवअनंत गर्जे यांची पत्नी गौरी पालवे यांची आत्महत्या

महाराष्ट्रातल्या मंत्रालयातले स्वीय सचिव अनंत गर्जे यांची पत्नी गौरी पालवे यांनी काल संध्याकाळी मुंबईतल्या आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. अनंत गर्जे हे पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सचिव म्हणून कार्यरत आहेत. गौरी पालवे सरकारी रुग्णालयात दंतरोगतज्ज्ञ म्हणून काम करत होत्या. त्यांचं गर्जे यांच्याशी फेब्रुवारी महिन्यात लग्न झालं होतं. ते पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याने गौरी यांनी हे पाऊल उचलल्याचा आरोप पालवे कुटुंबीयांनी के...