August 24, 2024 8:03 PM

views 41

मार्च २०२६ पर्यंत देशाला नक्षलवादी समस्येतून मुक्त करण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन

येत्या मार्च २०२६ पर्यंत देशाला नक्षलवादी समस्येतुन संपूर्ण मुक्त केलं जाईल असं प्रतिपादन केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी केलं आहे. ते आज छत्तीसगढ़ची राजधानी रायपुर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. माओवाद्यांविरुद्धची लढाई आता अंतिम टप्प्यात असल्याचं त्यांनी सांगितलं. आत्मसमर्पण करायला इच्छुक असलेल्या माओवाद्यांसाठी छत्तीसगढ़ सरकार लवकरच एक नवीन आत्मसमर्पण धोरण राबवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दहशतवादाचा प्रभाव असलेल्या सर्व क्षेत्रात कायदा आणि सुव्यवस्था स्थापन करण्याबरोबरच त्या क्षेत्रात ...

August 18, 2024 3:59 PM

views 76

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते १८८ हिंदू निर्वासितांना नागरिकत्व प्रमाणपत्रांचं वाटप

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अहमदाबाद इथल्या एका कार्यक्रमात १८८ हिंदू निर्वासितांना नागरिकत्व सुरक्षा कायद्यांतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्रांचं वाटप केलं. या कायद्यात नागरिकत्व काढून घेण्याची नाही, तर नागरिकत्व देण्याची तरतूद आहे, असं प्रतिपादन त्यांनी या कार्यक्रमात बोलताना केलं. याशिवाय अमित शहा १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांच्या अहमदाबाद महापालिकेच्या विविध विकास कामांचं उद्घाटनही करतील.

August 15, 2024 3:40 PM

views 54

प्रधानमंत्र्यांच्या भाषणात आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या संकल्पाचं प्रतिबिंब दिसतं – गृहमंत्री अमित शाह

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या संकल्पाचं प्रतिबिंब दिसतं, असं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं आहे. गेल्या दहा वर्षात झालेल्या विकासातून प्रेरणा घेऊन देशाला पुढे घेऊन जाण्याची वचनबद्धता या भाषणातून दिसते, असंही शाह म्हणाले. सशक्त भारत उभा करण्याची शपथ सर्व भारतीयांनी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

August 14, 2024 1:41 PM

views 55

गृहमंत्री अमित शाह यांनी निवासस्थानावर राष्ट्रध्वज फडकवला

“हर घर तिरंगा” मोहिमेचा भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज त्याच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानावर राष्ट्रध्वज फडकवला. कोट्यवधी भारतीयांमधली एकता,एकनिष्ठता आणि अभिमान याचं प्रतीक म्हणजेच तिरंगा, असं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या नोंदीमध्ये म्हटलं आहे. घरावर तिरंगा फडकवताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या देशनायकांचं स्मरण होत असल्याचंही त्यांनी लिहिलं आहे.  

August 13, 2024 1:13 PM

views 52

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहमदाबादमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज अहमदाबाद इथं तिरंगा यात्रेला सुुरुवात करतील. गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र यादव हेही या यात्रेत सहभागी होणार आहेत. घरोघरी तिरंगा अभियाना अंतर्गत पूर्व अहमदाबादच्या विराट नगर इथून ही यात्रा सुरू होणार आहे. जनतेमध्ये देशाप्रति अभिमानाची आणि एकतेची भावना जागवणं हा या यात्रेचा हेतू आहे. या यात्रेत मोठ्या संख्येनं लोक सहभागी होणार आहेत.

August 10, 2024 7:00 PM

views 48

मका, तांदूळ, फळं आणि बांबूच्या माध्यमातून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी बहुआयामी आणि भविष्यवादी दृष्टिकोन स्वीकारावा – अमित शहा

देशात ऊस पिकाव्यतिरिक्त मका, तांदूळ, फळं आणि बांबू यांच्या माध्यमातून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी बहुआयामी आणि भविष्यवादी दृष्टिकोन स्वीकारावा असं आवाहन आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं. नवी दिल्ली इथं झालेल्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. येत्या काही वर्षांत इथेनॉलची गरज वर्षाकाठी १ हजार कोटी लीटर इतकी भासणार असून हा एक फायदेशीर व्यवसाय आहे. सरकारने २०३० पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. भविष्यात इथेनॉल इ...

August 8, 2024 3:58 PM

views 63

लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक सादर

लोकसभेत आज वक्फ (दुरुस्ती) विधेयक २०२४ अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी सादर केलं. यात वक्फ कायदा १९९५ मध्ये सुधारणा करुन राज्य वक्फ बोर्डांचे अधिकार आणि कार्यप्रणाली तसंच वक्फ मालमत्तेची नोंदणी आणि सर्वेक्षणाशी संबंधित समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. अल्पसंख्याकांना न्याय देण्यासाठी हा कायदा आणण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं आहे. काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षानं या विधेयकाला विरोध केला असून सर्वपक्षीय बैठक बोलाव...

August 5, 2024 1:03 PM

views 52

लोकांना जलद आणि वेळेत न्याय मिळवून देण्याच्या दिशेनं देशातली न्याय यंत्रणा लवकरच मोठा टप्पा पार करेल – अमित शहा

लोकांना जलद आणि वेळेत न्याय मिळवून देण्याच्या दिशेनं देशातली न्याय यंत्रणा लवकरच मोठा टप्पा पार करेल असा विश्वास केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. ते काल चंदीगड इथं न्याय सेतू, न्याय श्रुती, इ-पुरावा आणि इ-समन यंत्रणांच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. नवीन गुन्हेगारी कायदे आपल्या राज्यघटनेशी सुसंगत असून लोकांना शिक्षा सुनावण्यापेक्षा न्याय देण्यावर भर देणारे आहेत असं अमित शहा म्हणाले.    

August 4, 2024 6:37 PM

views 43

चंदीगडमध्ये स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत बांधलेल्या २४तास पाणीपुरवठा प्रकल्पाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन

मोदी सरकार पूर्ण पाच वर्षं टिकेल, आणि २०२९ मधे पुन्हा रालोआ सरकारच सत्तेवर येईल  असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. चंदीगडमध्ये स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत बांधलेल्या २४तास पाणीपुरवठा प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर  ते बोलत होते. देशातल्या जनतेनं प्रधानमंत्री मोदी यांच्या कार्यावर विश्वास ठेवला आहे, मात्र विरोधक हे सरकार अस्थिर असल्याचा अपप्रचार करीत आहेत असं ते म्हणाले. फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणी प्रक्रीयेत न्यायव्यवस्थेला सहाय्यभूत ठरतील अशा विविध सेवांचं उद्घाटन केंद्रीय गृहमं...

August 3, 2024 8:11 PM

views 51

देशवासियांनी हर घर तिरंगा अभियानात उत्साहाने भाग घ्यावा, असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं आवाहन

देशवासियांनी हर घर तिरंगा अभियानात उत्साहाने भाग घ्यावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. येत्या ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान आपापल्या घरांवर तिरंगा फडकावून अभिमानाने स्वातंत्र्यदिन साजरा करावा असं त्यांनी आज समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधे म्हटलं आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून एकता दर्शवणारं हे अभियान गेली दोन वर्षं राष्ट्रीय चळवळ बनल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या घरावर फडकणाऱ्या तिरंगी झेंड्याबरोबरचं सेल्फी छायाचित्र काढून हरघरतिरंगा अभियानाच्या संकेतस्थळावर अपल...