January 9, 2025 1:22 PM

views 38

अमेरिकेतल्या जंगलात वणवा पेटला असून त्यात ५ जणांचा बळी

अमेरिकेतल्या लॉस एंजलीस जवळच्या जंगलात वणवा पेटला असून त्यात ५ जणांचा बळी गेला आहे. या वणव्यामुळे हजारो लोकांना स्थलांतरीत करण्यात आले असून अनेक घरंही या वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी आपला इटली दौरा रद्द केला आहे.

January 4, 2025 3:07 PM

views 49

अमेरिकेच्या पायाभूत प्रणालीत संगणक घुसखोरी केल्याबद्दल इंटेग्रिटी टेक्नॉलॉजी या चीनच्या सायबर सुरक्षा कंपनीवर अमेरिकेनं घातले निर्बंध

अमेरिकेच्या पायाभूत प्रणालीत संगणक घुसखोरी केल्याबद्दल इंटेग्रिटी टेक्नॉलॉजी या चीनच्या सायबर सुरक्षा कंपनीवर अमेरिकेनं निर्बंध घातले आहेत. फ्लॅक्स टायफून या हॅकिंग गटात या कंपनीचा मोठा सहभाग असल्याचं अमेरिकेच्या सरकारी निवेदनात म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाची काही कागदपत्र अवैधरित्या चीनला उपलब्ध झाल्याचं उघड झालं होतं.

January 2, 2025 2:32 PM

views 63

अमेरिकेत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी न्यू ऑरलियन्स इथल्या फ्रेंच क्वार्टर मध्ये एक व्यक्तीने गर्दीत ट्रक घुसवून केलेल्या हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला तर ३५ जण जखमी

अमेरिकेत काल नववर्षाच्या पहिल्याच दिवशी न्यू ऑरलियन्स इथल्या फ्रेंच क्वार्टर मध्ये एक व्यक्तीने गर्दीत ट्रक घुसवून केलेल्या हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला तर ३५ जण जखमी झाले. ट्रक घुसवणारा माथेफिरू तरुण ४२ वर्षाचा असून शमसुद्दींन बहार जब्बार अस त्याच नाव आहे आणि तो पोलिसांच्या गोळीबारात मारला गेला. त्याच्या कडून एक रायफल जप्त करण्यात आली असून ट्रक वर लावलेले काळे झेंडे कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत का याचा पोलिस तपास करत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी या घटनेचा निषेध केला असून...

December 21, 2024 4:35 PM

views 35

अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट खासदारांनी फेडरल फंडिंगवर करार केला नाही तर शटडाऊनची परिस्थिती उद्भवणार

अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट खासदारांनी फेडरल फंडिंगवर करार केला नाही तर शटडाऊनची परिस्थिती उद्भवणार आहे. तसे झाल्यास लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना ऐन नातळात पगार मिळणार नाही आणि अमेरिकन सरकारच्या सर्व आपत्कालीन सेवा वगळता सर्व गोष्टी ठप्प होतील. कालच्या बैठकीनंतर सभागृहाचे अध्यक्ष माईक जॉन्सन यांनी खर्चाच्या उपाययोजनांवर मतदान होणार असल्याची माहिती दिली आहे.  

December 1, 2024 3:18 PM

views 63

‘फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखपदी भारतीय वंशाचे काश पटेल यांची नियुक्ती

अमेरिकेच्या ‘एफबीआई’ अर्थात, ‘फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखपदी भारतीय वंशाचे काश पटेल यांची नियुक्ती झाली आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ही नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर अमेरिकेच्या प्रशासनातली भारतीय वंशाचे असलेल्या दुसऱ्या व्यक्तीची ही नेमणूक आहे. काश हे एक उत्तम वकील आणि अन्वेषक असून भ्रष्टाचार उघडकीला आणण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

November 17, 2024 11:36 AM

views 52

डोनाल्ड ट्रम्प यांनी ऊर्जा विभागाच्या प्रमुखपदी ख्रिस राईट यांची निवड जाहीर केली

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऊर्जा विभागाच्या प्रमुखपदी ख्रिस राईट यांची निवड जाहीर केली आहे. राईट हे लिबर्टी एनर्जी या जीवाश्म इंधनाच्या पुरस्कर्त्या संस्थेचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ट्रम्प यांच्या तेल आणि वायूचं उत्पादन वाढवण्याच्या उद्दिष्टांशी त्यांची मतं जुळतील अशी अपेक्षा आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय हवामान बदलासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल ट्रम्प यांच्या धोरणाचं ते समर्थन करतील अशी शक्यता आहे. हवामान बदलाच्या चिंतेला अतिशयोक्तीपूर्ण म्हणून...

October 16, 2024 3:01 PM

views 46

निर्मला सीतारामन उद्यापासून मेक्सिको आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन उद्यापासून मेक्सिको आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या १७ ते २० ऑक्टोबर दरम्यान मेक्सिको दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात सीतारामन ‘टेक लीडर्स’ गोलमेज परिषदेचं अध्यक्षपद भूषवतील. या परिषदेच्या निमित्तानं माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या भारतीय दिग्गजांसह या जागतिक स्तरावरचे अनेक तज्ज्ञ आणि उद्योजक एकत्र येत आहेत.   सीतारामन मेक्सिकोचे अर्थमंत्री रोगलिओ रामिरेझ दे लाओ यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेणार असून संसदीय सहकार्य बळकट करण्या...

October 13, 2024 1:50 PM

views 47

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दक्षिण आफ्रिकेतील देशांच्या दौऱ्यावर रवाना

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सकाळी अल्जीरिया, मॉरिटानिया आणि मलावी या ३ राष्ट्रांच्या भेटीवर रवाना झाल्या. या आफ्रिकी देशांना भेट देणाऱ्या त्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती आहेत. त्या आज रात्री अल्जीरियात दाखल होतील. अल्जीरिया भेटीत त्या अनेक द्विपक्षीय बैठका घेतील आणि सोबतच भारतीय वंशाच्या लोकांची भेट घेतील. त्या अल्जीरियाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतील तसंच तेथील सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या स्थळांनाही त्या भेट देतील. १६ तारखेला त्या मॉरिटानियाला तर १७ तारखेला त्या मलावी या देशाला...

August 4, 2024 2:02 PM

views 62

इस्राइल आणि हिजबुल्लाह यांच्यात युद्ध परिस्थिती निर्माण झाल्यास खबरदारी म्हणून अमेरिका आणि इंग्लडनं लेबनाॅन मधल्या आपल्या नागरिकांना तिथून तातडीनं बाहेर पडण्याची सूचना

इस्राइल आणि हिजबुल्लाह यांच्यातल्या तीव्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर युद्ध परिस्थिती निर्माण झाल्यास खबरदारी म्हणून अमेरिका आणि इंग्लडनं लेबनाॅन मधल्या आपल्या नागरिकांना तिथून तातडीनं बाहेर पडण्याची सूचना केली आहे. अनेक विमान कंपन्यानी लेबनाॅन मधल्या हवाई सेवा रद्द केल्या असल्या तरी अद्याप काही विमानसेवा उपलब्ध आहेत असं लेबनाॅन मधल्या अमेरिकी दूतावासानं सांगितलं आहे. दरम्यान स्वीडननं सर्वात आधी बेरुट मधला दूतावास बंद केला आहे.

July 28, 2024 2:22 PM

views 45

‘निवडून आल्यास अमेरिकेला जगातली क्रिप्टो भांडवल आणि बिटकॉईनची महासत्ता बनवू’

आपण निवडून आलो तर अमेरिकेला या जगातली क्रिप्टो भांडवल आणि बिटकॉईनची महासत्ता बनवू, असं आश्वासन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं आहे. नॅशव्हिल इथं आयोजित बिटकॉइन २०२४ या परिषदेत ते बोलत होते. आपलं प्रशासन क्रिप्टो चलनासाठी धोरण तयार करणार असून त्यासाठी सल्लागार समितीही स्थापन केली जाईल, असंही ट्रम्प यावेळी म्हणाले.