January 17, 2026 6:26 PM

views 71

महानगरपालिका निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं भाजपाचं अभिनंदन

महानगरपालिका निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाचं अभिनंदन केलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधे पक्षाचा पराभव झाल्यानंतर ते आज पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. निवडणूक निकालाचं पक्षाचे नेते एकत्र बसून विश्लेषण करतील असं पवार म्हणाले. प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतो, भाजपाने यात लक्षणीय यश मिळवलं आहे, असं पवार म्हणाले.  त्याआधी बारामती इथं उपमुख्यमंत्री  अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. त्यानंतर शऱ...

September 11, 2025 1:14 PM

views 101

नेपाळमधे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सूरु

नेपाळमधे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिली. ठाणे, पुणे, मुंबई, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुमारे १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती आतापर्यंत प्राप्त झाली आहे. 

July 3, 2025 3:42 PM

views 59

परदेशी शिष्यवृत्ती प्रवेश प्रक्रियेबाबत समान धोरण राबविण्यात येईल- उपमुख्यमंत्री

बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये यापुढे विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. या संस्थांमधली विद्यार्थ्यांची संख्या, सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रियेबाबत समान धोरण राबविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा अहवाल आला आहे. त्यावरुन लवकरच निर्णय घेऊ असं ते म्हणाले.

July 2, 2025 3:07 PM

views 73

पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून राज्यात सुरु असलेल्या विकास प्रकल्पांची कामे पुढील शंभर वर्षांचा विचार करून आखावीत – उपमुख्यमंत्री अजित पवार

पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून राज्यात सुरु असलेल्या विकास प्रकल्पांची कामे पुढील शंभर वर्षांचा विचार करून आखावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ते आज मंत्रालयात आयोजित बैठकीत बोलत होते. राज्याच्या विकासाची कामे पुढील शंभर वर्षांचा विचार करुन नियोजित वेळेत दर्जेदार पणे पूर्ण व्हावीत यासाठी केंद्रीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी त्यांनी राज्यात सुरु असलेल्या विविध विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. या बैठकीला विविध विभागांचे सचिव ...

June 4, 2025 7:24 PM

views 78

जपानचे वाणिज्य दूतावास अधिकारी यागी कोजी यांनी अजित पवार यांची घेतली भेट

जपानचे वाणिज्य दूतावास अधिकारी यागी कोजी यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली. जपानची भारतात मोठी गुंतवणूक आहे.   रोजगारनिर्मितीबरोबरच राज्याच्या औद्योगिक, आर्थिक, सामाजिक प्रगतीत मोलाचं योगदान देणाऱ्या जपानी कंपन्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.   उद्योग तसंच आर्थिक क्षेत्रातील सहकार्यासोबतच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही भारत आणि जपान यांच्यातील सहकार्य वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याबाबतही त्...

April 26, 2025 2:45 PM

views 53

सामाजिक विकासाच्या कामासाठी सरकार कायमच पुढे राहील- उपमुख्यमंत्री

सामाजिक विकासाच्या कामासाठी सरकार कायमच पुढे राहील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज परभणी इथं श्री क्षेत्र नृसिंह मंदिराला भेट दिल्यावर बोलत होते. परभणी जिल्ह्यातली विविध विकासकामं आणि योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात पवार यांच्या उपस्थितीत आज जिल्हास्तरीय बैठक होणार आहे.   पवार आज हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यालाही भेट देणार आहेत. परभणीत महापालिकेचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री हिंगोली जिल्ह्यातील गुंज या गावाला भेट देऊन विहिरीत पडून मृत्युमुखी पडलेल्या सात महिलांच्या कुटु...

March 21, 2025 8:13 PM

views 85

राज्याचा आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर

राज्याचा २०२५-२६ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी आज मंजूर केला. विधानसभेत अर्थसंकल्पातल्या अनुदानाच्या विभागवार मागण्यांवर सभागृहात चर्चा झाली आणि त्या मंजूर झाल्या. त्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी मंजुरीसाठी महाराष्ट्र विनियोजन विधेयक सादर केलं आणि ते सभागृहानं एकमतानं मंजूर केलं.   विधान परिषदेनेही या विधेयकाला मान्यता दिली.महाराष्ट्र मोटार वाहन सुधारणा विधेयक सदस्यांच्या सूचनांसह विधानसभेत पाठवण्यात आलं.‌ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे विधेयक विधानपरिष...

March 20, 2025 6:53 PM

views 78

धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टर २० हजार रुपये निधी २ हेक्टरसाठी देण्याची अजित पवार यांची घोषणा

राज्यातल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २० हजार रुपये निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. जास्तीत जास्त २ हेक्टरसाठी हा निधी दिला जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.   सोमवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं वित्त विभागाच्या अर्थसंकल्पीय अनुदानावरच्या मागण्यांना उत्तर देताना त्यांनी सांगितलं. शेतकरी कर्जमाफी संदर्भात माहिती गोळा करायचं काम सुरू आहे, असंही ते म्हणाले.   येत्या आर्थिक वर्षात १०० टक्के महसुल जमा करुन राज्या...

March 12, 2025 7:21 PM

views 65

भेसळीचं पनीर विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार- अजित पवार

कृत्रिम किंवा भेसळीचं पनीर आरोग्यासाठी धोक्याचं असून त्याच्या विक्रेता आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितलं.   अशा प्रकारची भेसळ ओळखण्यासाठी नवीन प्रयोगशाळा सुरु करण्यासाठी तसंच प्रयोगशाळांचं बळकटीकरण करण्यासाठी भरीव निधी देऊ, संबंधित नियमांमधे बदल करण्यासाठी संबंधित मंत्र्यांशी चर्चा करु , असं आश्वासन पवार यांनी दिलं.

March 11, 2025 9:27 AM

views 87

महाराष्ट्राचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर

महाराष्ट्राचा आगामी आर्थिक वर्षाचा 7 लाख 20 कोटी रुपयांचा आणि सुमारे 45 हजार 891 कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत सादर केला. विधान परिषदेत अर्थराज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी अर्थसंकल्प मांडला.   आगामी आर्थिक वर्षात महसुली जमा पाच लाख 60 हजार 964 कोटी रुपये तर महसुली खर्च सहा लाख सहा हजार 855 कोटी रुपये अंदाजित असल्याचं, या अर्थसंकल्पात म्हटलं आहे. शेती, उद्योग, पर्यटन, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास क्षेत्रांसाठी या अर्थसंकल्पत भरीव तरतूद करण्यात आली आ...