November 30, 2024 2:29 PM

views 67

राजधानी दिल्लीत काही भागांत हवा गुणवत्ता निर्देशांकाची पातळी ४०० अंकांवर

राजधानी दिल्लीत आजही हवेचा गुणवत्ता स्तर खूप खालावलेला आहे. सकाळी ७ वाजता हवा गुणवत्ता निर्देशांकांची सरासरी ३४८ इतकी नोंदवली गेली. शहराच्या काही भागांत हवा गुणवत्ता निर्देशांकाची पातळी ४०० अंकांवर गेली आहे. पुढचे दोन दिवस दिल्ली आणि एनसीआर भागात रात्री आणि पहाटेच्या वेळी धुरकं राहील, अशी शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे.

November 9, 2024 8:06 PM

views 56

वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाच्या अध्यक्षांची आज नवी दिल्लीत बैठक

ग्रेडेड रिस्पॅान्स ऍक्शन प्लॅन अंतर्गत वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी उचलेल्या पावलांचा आढावा घेण्यासाठी वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाच्या अध्यक्षांनी आज नवी दिल्लीत बैठक घेतली. दिल्लीचे मुख्य सचिव आणि दिल्ली सरकारच्या संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. तक्रारींचे जलद निराकरण सुनिश्चित करण्यासाठी नियमांचे उल्लंघन केल्याची प्रकरणे त्वरित हाताळली जावीत, यावरही भर देण्यात आला. वायू प्रदूषण रोखण्यासाठी मशिनद्वारे रस्ते स्वच्छ करणे, पाणी शिंपडणे आणि अँटी स्मोक गन वापरणे य...

October 25, 2024 7:53 PM

views 53

वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे राज्य सरकारांना विशेष तयारी ठेवण्याचे आदेश

देशातल्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारांना विशेष तयारी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्य सेवेचे महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य विभागांना वायू प्रदूषणाच्या तयारीबाबत पत्र लिहिलं आहे. या पत्रात वायू प्रदूषणाचा श्वसनक्रिया, हृदय तसंच रक्तवाहिन्यांसंबंधीच्या यंत्रणांना प्रभावित करणाऱ्या आजारांशी थेट संबंध असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे. लहान मुलं, गरोदर महिला आणि वृद्धांवर याचा अधिक परिणाम होत असल्याने राज्य तसंच केंद्रशासित प्रद...

October 19, 2024 8:28 PM

views 93

दिल्लीतल्या हवा प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ

राजधानी दिल्लीतल्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून  हवेच्या गुणवत्तेची पातळी ‘खराब’ श्रेणी मध्ये असल्याचं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं जाहीर केलं आहे.  काल राजधानी दिल्लीत हवा गुणवत्ता निर्देशांक २९२ इतका नोंदवला गेला.