June 12, 2025 8:34 PM

views 45

अहमदाबाद इथं नागरी वस्तीत विमान कोसळून अपघात

अहमदाबाद विमानतळावरुन लंडनकडे उड्डाण केलेलं विमान अवघ्या काही मिनिटात अहमदाबाद विमानतळाच्या जवळ आज दुपारी कोसळलं. या विमानात प्रवासी आणि कर्मचारी मिळून २४२ जण होते. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त होते आहे. अहमदाबादमधलं बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचं वसतीगृह, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या इमारतीवर हे विमान कोसळलं. तिथे राहणारे लोकंही मृत्यूमुखी पडल्याची आणि जखमी झाल्याची शक्यता व्यक्त होते आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी थोड...

June 12, 2025 8:15 PM

views 55

अहमदाबाद विमान अपघाताबद्दल जगभरातून शोक व्यक्त

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. ही दुर्घटना दुर्दैवी असून विमान प्रवाशांप्रती संवेदना असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिली आहे.    ही दुर्घटना अतिशय दुर्दैवी असून दुःख व्यक्त करायला शब्द अपुरे पडत असल्याची प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या...