August 7, 2026 1:35 PM

views 66

अग्नी-4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

अग्नी-४ या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल घेण्यात आली. ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रातून या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण झालं.   ही यशस्वी प्रक्षेपण चाचणी देशाच्या सामरिक क्षमता मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचा टप्पा आहे, असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. या यशस्वी मोहिमेबद्दल स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि डीआरडीओचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अभिनंदन केलं आहे.