November 16, 2025 7:37 PM

views 54

१ जानेवारीपासून नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत पाकिस्तानमध्ये १ लाखापेक्षा जास्त अफगाण नागरिक बंदी

पाकिस्ताननं यंदाच्या १ जानेवारीपासून नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत १ लाखापेक्षा जास्त अफगाण नागरिकांना बंदी बनवल्याचं UNHCR, अर्थात संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांसाठीच्या उच्चायुक्तालयानं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे.  बलुचिस्तानमध्ये चांगाई आणि क्वेट्टा, तर पंजाब प्रांतात सर्वाधिक संख्येनं अटक झाली असून, यापैकी केवळ २४ टक्के लोकांकडे अफगाणिस्तानच्या नागरिकत्वाची नोंदणी कार्ड  होती, असं यात म्हटलं आहे.  इस्लामाबाद आणि रावळपिंडी इथून अफगाण स्थलांतरितांना बाहेर काढण्याच्या, तसंच पोलिसांना नों...

October 12, 2025 2:21 PM

views 69

पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तीव्र संघर्ष सुरु

तालिबाननं पाकिस्तानी लष्करी चौक्यांवर काल रात्री केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तीव्र संघर्ष सुरु झाला आहे. पाकिस्ताननं अफगाणिस्तानची राजधानी काबूलसह अन्य ठिकाणी केलेल्या हवाई हल्ल्यांना तालिबानी लष्करानं प्रत्युत्तर दिलं असून, बहरामपूर जिल्ह्यातल्या डुरंड रेषेजवळ अफगाण सैन्यानं केलेल्या कारवाईत १५ पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचं अफगाणिस्तानच्या सरकारी सूत्रांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितलं. पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात सात ठिकाणी आपण हल्ले केल्याचं तालिबाननं जाहीर केलं आहे. तर...