November 8, 2025 7:58 PM

views 43

पाकिस्ताननं अफगाणिस्तानमध्ये केलेल्या हल्ल्यात ६ नागरिकांचा मृत्यू

अफगाणिस्तान मधल्या  कंधार प्रांतातल्या  बोल्दाक इथं पाकिस्ताननं आज केलेल्या हल्ल्यात सहा नागरिक मृत्युमुखी पडले,  तर पाच जण जखमी झाले. या भागात पाकिस्ताननं डागलेल्या तोफांमुळे काही घरांचं आणि व्यावसायिक आस्थापनांचं देखील नुकसान झालं. पाकिस्ताननं युद्धविरामाचं  उल्लंघन केल्याचा आरोप अफगाणिस्ताननं केला असून इस्तंबूलमध्ये पाकिस्तान आणि तालिबान अधिकाऱ्यांमध्ये झालेली  शांतताविषयक  चर्चा निष्फळ ठरल्यानंतर हा हल्ला झाला आहे.

October 15, 2025 8:27 PM

views 47

पाकिस्ताननं केलेली शस्रसंधीची विनंती अफगाणिस्तानकडून मान्य

पाकिस्तानच्या विनंतीवरून अफगाणिस्ताननं शस्त्रसंधी करायला संमती दिली आहे. तालिबानचे प्रवक्ते झबिनुल्ला मुजाहिद यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.    पाकिस्ताननं आज सकाळी पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या स्पिन बोलडक भागात हल्ला केला. त्यात १२ अफगाणी नागरिक ठार, तर १०० पेक्षा जास्त जखमी झाले. प्रत्युत्तरादाखल अफगाणिस्तानच्या सशस्त्र दलांनी अनेक पाकिस्तानी जवानांना ठार केलं. तसंच त्यांची ठाणी, शस्त्रास्त्रं आणि रणगाडे ताब्यात घेतल्याचा दावा तालिबाननं केला. या हिंसाचाराबद्दल संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्य...