February 10, 2025 1:24 PM

views 46

एअरो इंडिया-२०२५ चं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

सुरक्षा व्यवस्था मजबूत असेल तरच शांतता प्रस्थापित करणं शक्य आहे, त्यानंतरच आपण एका चांगल्या जगासाठी काम करू शकतो, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. बंगळुरू इथं एअरो इंडिया २०२५ चं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते. एअरो इंडिया हे भारताच्या संरक्षण सामुग्रीचं प्रदर्शन असून ते आशिया खंडातलं सर्वात मोठं प्रदर्शन मानलं जातं.   भारतानं नेहमीच शांतता आणि स्थैर्याचं समर्थन केलं आहे, मात्र केवळ एका देशात हे शक्य नसून संपूर्ण जगासाठीच हे महत्वाचं आहे, असं राजनाथ सिंह यावेळी म्हणा...