October 3, 2024 3:06 PM

views 40

सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू

तूळजापूरहून गोणेवाडी इथं देवीची ज्योत घेवून जाणारं चारचाकी वाहन सोलापूर मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावरील कामती इथं उलटल्यामुळे झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. तसंच पाच जण जख्मी झाले आहेत. घटनास्थळी पोचल्यानंतर पोलिसांनी ही माहिती दिली. जखमींना नजिकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

October 2, 2024 1:35 PM

views 33

पुण्यात बावधन इथं हेलिकॉप्टर दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू

पुण्यातल्या बावधन इथे आज सकाळी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन वैमानिक आणि एका अभियंत्याचा समावेश आहे. बावधन परिसरात आज सकाळी पावणे सात वाजता ही दुर्घटना घडली. परिसरातल्या घटनास्थळी पुणे महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तसंच अग्निशमन दलाकडून बचावकार्य करण्यात आलं.

September 30, 2024 1:30 PM

views 45

उत्तरप्रदेशात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू

उत्तरप्रदेशात काल झालेल्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. नोएडा इथं ट्रॅक्टर आणि कारच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सोनभद्रमध्ये कारचालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातात एक जणाचा...

September 29, 2024 3:04 PM

views 51

गुजरातमधल्या द्वारका इथं बस अपघातात ७ ठार, १५ जखमी

गुजरात राज्यात द्वारका जिल्ह्यात रस्त्यावर बससमोर आलेल्या गुराला वाचवताना बसचालकाचं बसवरचं नियंत्रण गेल्याने बस दुभाजक तोडून समोरच्या तीन गाड्या आणि एका मोटारसायकलला फरफटत घेऊन थांबली. काल रात्री उशीरा झालेल्या या अपघातात ७ जण ठार झाले तर १५ जण जखमी झाले आहेत.

August 25, 2024 3:47 PM

views 35

नागपूर-अमरावती महामार्गावर शिवशाही बसला झालेल्या अपघातात २ ठार, २४ जखमी

नागपूर - अमरावती महामार्गावर नांदगावपेठ जवळ राज्य परिवहन महामंडळ एसटीच्या शिवशाही बसला झालेल्या अपघातात दोन प्रवासी ठार तर २४ जण जखमी झाले आहेत. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. नागपूरहून अकोल्याला जाणाऱ्या बससमोर अचानक आडव्या आलेल्या गायीला वाचवताना नियंत्रण सुटल्यानं ही बस उलटून हा अपघात झाला.

August 24, 2024 10:18 AM

views 45

नेपाळमध्ये बस नदीत पडून झालेल्या अपघातात २७ जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये बस नदीत पडून झालेल्या अपघातात 27 जणांचा मृत्यू झाला असून यात महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील 24 जणांचा समावेश आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतदेह तातडीनं महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. हे सर्व मृतदेह वायुसेनेच्या विमानानं आज नाशिक इथं आणण्यात येतील; त्यानंतर ते त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार आहेत.

August 19, 2024 10:19 AM

views 44

राज्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये आठ जणांचा मृत्यू

सिन्नरहून मुंबईकडे दूध घेऊन निघालेला दुधाचा टँकर काल दुपारी कसारा घाटातील दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला; तर चौघे जखमी झाले आहेत. टँकर भरधाव वेगात कसारा घाट उतरत असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि लोखंडी संरक्षक कठड्याच्या जाळ्या तोडून अंदाजे 250 फूट खोल दरीत तो कोसळला. रायगड जिल्ह्यातल्या महाडच्या सावित्री नदीपात्रात बुडून काल तीन जणांचा मृत्यू झाला. बचाव पथकानं तिघांचेही मृतदेह बाहेर काढले आहेत. सावित्री नदी पलीकडे असलेल्या दर्ग्यात दर्शनासाठी जात असताना एकाचा पाय घसरू...

August 15, 2024 6:46 PM

views 47

वाशिम – समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू, तीन जखमी

वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आज झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. मृतांमधे सात वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. अपघातग्रस्त गाडी नागपूरहून मुंबईला जात असताना वाशिम जिल्ह्यात हा अपघात झाला. जखमींना अमरावती इथं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

July 23, 2024 8:08 PM

views 37

मेळघाटात मध्य प्रदेशाच्या सीमेवर झालेल्या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू

मेळघाटात मध्य प्रदेशाच्या सीमेवर मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटून झालेल्या दुर्घटनेत तीन प्रवाशांचा मृत्यु झाला, तर ११ जण गंभीर झाले. मध्य प्रदेशातल्या खालवा तालुक्यात रोशनी चौकी इथं हा अपघात झाला. भर पावसात स्थानिक प्रशासनानं मदत कार्य सुरु केलं आहे.

July 19, 2024 9:37 AM

views 43

जालना जिल्ह्यात भाविकांच्या गाडीला अपघात

जालना जिल्ह्यात प्रवासी वाहतूक करणारी खासगी जीप रस्त्यालगतच्या विहिरीत पडून सात जणांचा मृत्यू झाला. बदनापूर तालुक्यातल्या चनेगाव इथले काही भाविक पंढरपूर वारीकरून जालना इथं परतत असतांना, काल संध्याकाळी जालना-राजूर मार्गावर तुपेवाडी फाट्याजवळ खडेश्वर बाबा मंदिर परिसरात या जीपची एका दुचाकीशी धडक झाली, त्यानंतर ही जीप रस्त्यालगतच्या विहिरीत पडून हा अपघात झालामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून या अपघाताची माहिती घेतली. मयत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना ...