November 20, 2025 10:11 AM

views 80

मुकबधिरांच्या ऑलिंपिक स्पर्धेत नेमबाजीत अभिनव देश्वाल आणि प्रांजली धुमाळ या जोडीला सुवर्णपदक

जपानमध्ये टोकिओ इथं सुरू असलेल्या मूकबधीरांच्या 25 व्या ऑलिंपिक स्पर्धेत अभिनव देश्वाल आणि प्रांजली धुमाळ या भारतीय नेमबाज जोडीनं 10 मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं.   अंतिम लढतीत त्यांनी चिनी तैपाईच्या जोडीला 16-6 असं पराभूत केलं. तर, कुशाग्र सिंग राजावतनं 50 मीटर रायफल प्रोन स्पर्धेत कास्य पदक पटकावलं. या स्पर्धेत नेमबाजीत भारतानं आतापर्यंत एकूण 11 पदकांची कमाई केली आहे.