September 16, 2024 1:42 PM

views 19

आठव्या भारत जल सप्ताह २०२४ ची सुरुवात उद्या नवी दिल्लीत होणार

आठव्या भारत जल सप्ताह २०२४ ची सुरुवात उद्या नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथे होणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील. चार दिवसांच्या या कार्यक्रमात ४० देशातले दोनशे प्रतिनिधी सहभागी होतील. या कार्यक्रमात शंभरहून अधिक दालनं आणि जलक्षेत्रातले स्टार्टअप्स आपल्या संकल्पना मांडतील.