June 24, 2025 3:36 PM

views 39

अंदाज समित्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित राष्ट्रीय परिषदेचा समारोप

केंद्र आणि राज्य सरकारकडून कल्याणकारी योजनांवर होणारा खर्च वाढत असल्याने संसद आणि विधिमंडळाच्या अंदाज समित्यांची जबाबदारी वाढली असून या समित्यांनी अधिक कार्यक्षमतेने जबाबदारीचं पालन करावं असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज मुंबईत विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात केलं. अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात ते बोलत होते. देशावरील कर्जाचा भार पाहता जन कल्याणासाठी अधिक खबरदारीने खर्च करण्याची गरज आहे. त्यात या समित्यांची भूमिका महत्वाची असल्याचे ते म्हणाले.   संसदी...

June 23, 2025 8:39 PM

views 61

अंदाज समित्यांनी दिलेल्या शिफारसींमुळे प्रशासनाला योग्य दिशा मिळते – लोकसभेचे सभापती ओम बिर्ला

सरकारची धोरणं, योजना आणि कृतींवर अंदाज समित्यांनी दिलेल्या शिफारसींमुळे प्रशासनाला योग्य दिशा मिळत असल्याचं प्रतिपादन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केलं. ते आज मुंबईत राष्ट्रीय अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षं पूर्ण होत असल्यानिमित्ताने विधान भवनात आयोजित दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनावेळी बोलत होते. अंदाज समित्या या आर्थिक वाटप आणि अर्थसंकल्पीय खर्चाचं पारदर्शकतेने निरीक्षण करतात, असंही बिरला यावेळी म्हणाले. यावेळी बिरला यांच्या हस्ते वर्धापन दिन स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं. अर्थसंकल्...