December 17, 2024 1:17 PM

views 59

भारत लोकशाहीची जन्मभूमी आहे – मंत्री जगतप्रकाश नड्डा

भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यसभेतल्या चर्चेला आज पुन्हा सुरुवात झाली. सभागृहाचे नेते आणि केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी आपल्या भाषणात सांगितलं की भारत केवळ जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे असं नव्हे तर लोकशाहीची जन्मभूमी देखील आहे. भारतीय संस्कृती आणि परिसंस्थेत स्वातंत्र्य, समता आणि समावेशन तसंच नागरिकांना सन्मानाने जगण्याची संधी ही लोकशाही तत्वं मुळापासून रुजली आहेत असं ते म्हणाले. 

December 16, 2024 7:27 PM

views 69

राज्यसभेत भारताच्या राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वाटचालीवर विशेष चर्चा

काँग्रेसनं राज्यघटनेत ज्या सुधारणा केल्या त्या लोकशाहीला बळकट करण्यापेक्षा स्वत:च्या कुटुंबाला मदत म्हणून आणि सत्ता वाचवण्यासाठी केल्या, असा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज केला.  राज्यसभेत आज प्रश्नोत्तरांचा तास आणि शून्य प्रहराचं कामकाज बाजूला ठेवून राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वाटचालीवर विशेष चर्चा झाली. या चर्चेची सुरुवात सितारामन यांनी केली. घटनासमितीच्या सदस्यांप्रति आदर व्यक्त करत त्यातल्या १५ महिला सदस्यांचा त्यांनी विशेष  उल्लेख केला. महिला कल्याण आणि महिला आरक्षणासाठी ...

December 16, 2024 3:14 PM

views 63

राज्यसभेत दोन दिवस राज्यघटनेवर विशेष चर्चा

राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यघटनेवरील विशेष चर्चा आज राज्यसभेत सुरू होईल. भाजपानं आपल्या खासदारांसाठी तीन ओळींचा व्हिप जारी करुन सर्व खासदारांनी आज आणि उद्या राज्यसभेत हजर राहावं असे आदेश दिले आहेत.