December 3, 2025 8:26 PM

views 57

ODI Cricket: विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाडचं दमदार शतक

रायपूर इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात, भारतानं दक्षिण आफ्रिकेपुढं विजयासाठी ३५९ धावांच आव्हान ठेवलं आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रिक केलं. भारतानं ५० निर्धारित षटकात ५ गडी गमावून ३५८ धावा केल्या. त्यात विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड या शतकवीरांचा मोलाचा वाटा आहे. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी १९५ धावांची भागिदारी केली. कोहलीनं १०२, तर ऋतुराजनं १०५ धावा केल्या. के एल राहुलनं नाबाद ६६, तर रविंद्र जडेजानं नाबाद २४ धावांचं योगदान दिल. 

October 25, 2025 8:23 PM

views 79

3rd ODI Cricket: भारतानं सामना जिंकला, रोहित शर्माचं शतक

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ इथं रंगलेल्या आजच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा ९ गडी राखून पराभव केला. तीन सामन्यांच्या या मालिकेतील या आधीचे दोन्ही सामने आणि मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली आहे.   ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ४६ षटकं आणि  ४ चेंडूत २३६ धावा केल्या.  भारतान केवळ ३८षटकं ३ चेंडूत ही धावसंख्या पार केली. रोहित शर्माच्या १२१ धावांच्या खेळीला विराट कोहलीनं ७४ धावा काढून चांगली साथ दिली. या दोघांच्या १६७ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं हा व...