August 13, 2024 8:01 PM

views 26

वक्फ दुरुस्ती विधेयकाविषयी संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्षपदी जगदंबिका पाल यांची नियुक्ती

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी वक्फ दुरुस्ती विधेयक २०२४ साठी गठीत करण्यात आलेल्या  संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्षपदावर भाजपा  खासदार जगदंबिका पाल यांची नियुक्ती केली आहे. विधेयकावर पुढल्या पडताळणीसाठी ३१ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ही समिती आपला अहवाल सादर करेल.

August 11, 2024 1:33 PM

views 40

वक्फ सुधारणा विधेयक २०२४चा आढावा घेण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना

वक्फ दुरुस्ती विधेयक, २०२४ चं पुनरावलोकन करण्यासाठी स्थापन केलेली ‘जेपीसी’ अर्थात, संयुक्त संसदीय समिती, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी लोकसभेला आपला अहवाल सादर करेल, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी काल सोशल मीडियावरील संभाषणादरम्यान, दिली. या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख ही संसदीय समिती जाहीर करेल, मुस्लिमांसह,  सकारात्मक योगदान देऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही संस्था किंवा व्यक्तींला या समितीच्या कामकाज प्रक्रियेत सहभागी होता येईल, असं त्यांनी ...

August 7, 2024 3:37 PM

views 45

लोकसभेत २०२४ च्या अर्थ विधेयकावर चर्चा

लोकसभेत आज २०२४साठीच्या अर्थ विधेयकावरच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संध्याकाळी या चर्चेला उत्तर देण्याची शक्यता आहे. दरम्यान, या वर्षीच्या अर्थंसंकल्पातली ध्येयं साध्य करण्यासाठी हे अर्थविधेयक मदत करेल, असा विश्वास या चर्चेदरम्यान भाजपच्या खासदार जगदंबिका पाल यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे मुहम्मद हमदुल्ला सयीद यांनी अर्थ विधेयकाला विरोध केला. हे सरकार कॉर्पोरेट कंपन्यांना करात अधिक सवलत देत असून सामान्य नागरिकांवरचा कर वाढवत असल्याचा आरोप त्यांनी केला. ही चर्चा ...